साने गुरुजी |
---|
समुह गीत |
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ॥धृ ० ॥ हे कंकण करि बांधियले , जनसेवे जीवन दिधले , राष्ट्रार्थ प्राण हे उरले , मी सिद्ध मरायाला हो । बलसागर ।।१ ।। वैभवी देश चढवीन , सर्वस्व त्यास अपन , हा तिमिर घोर संहारिन , या बंधू सहाय्याला हो । बलसागर ॥२ ॥ हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून , या कार्य करायाला हो । बलसागर ॥३ ॥ करि दिव्य पताका घेऊ , प्रिय भारत गीते गाऊ , विश्वास पराक्रम दावू , ही माय निजपदा लाहो । बलसागर ॥४ ॥ या उठा करू हो शर्थ , संपादू दिव्य पुरुषार्थ , हे जीवन ना तरि व्यर्थ , भाग्यसूर्य तळपत राहो । बलसागर . ॥५ ॥ ही माय थोर होईल , वैभवे दिव्य शोभेल , जगतास शांति देईल , तो सोन्याचा दिन येवो । बलसागर ॥६ ॥ - साने गुरुजी |
समुह गीत |
असो तुला देवा माझा सदा नमस्कार , तुझ्या दया दातृत्वाला , अंत नाही पार ॥ध्रु .।। तुझ्या कृपेने रे होतील , फुले पत्थराची तुझ्या कृपेने रे होतील , मोती मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होतील , सर्प रम्य हार असो तुला देवा माझा सदा नमस्कार ।। १ ।। तुझ्या कृपेने रे होईल , उषा त्या निशेची तुझ्या कृपेने रे होईल , सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने रे होईल , पंगु सिंधू पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार || २ || तुझ्या कृपा सिंधूमधला , बिंदू जरि मिळेल तरि प्रभो शतजन्माची मतृष्णा शमेल तुझा म्हणूनि आलो रामा , बघत - बघत दार असो तुला देवा , माझा सदा नमस्कार || ३ || - साने गुरुजी |
- Home
- mega menu
- शासकीय G.R.File
- _ रजा Gr
- Income Tax
- Dwonlod Apps
- _जी.पी.एफ.Apps
- _T.C.Apps
- _Medical bill Apps
- _Pay Bill Apps
- _Earn Live Apps
- _Bonafaed Apps
- Phoshan Aahar Yojna
- _करार नाम फॉर्म
- _Shaley Phoshan Ahar Apps
- फॉर्म व कोरे तक्क्ते
- _A TO K Form
- _विकल्प फॉर्म
- 7 Pay File
- Arrears Bill Apps/एरीयस बिल काढणे
- _D.A.Arrears Jan.022 To Aug.022
- प्रार्थना एवम राष्ट्रगीत
- _प्रार्थना राष्ट्रगीत भाग 1
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- _प्रार्थना भाग 1
- साने गुरुजी
- _समुह गीत भाग 1
- सांस्कृतिक कार्यक्रम
- _स्नेह संमेलन सन 2019-2020
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog