Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

How to Ajintha caves ,अजिंठा लेणीची माहिती

अजिंठा लेणी माहिती


अजिंठा गुफा महाराष्ट्र स्थित भारतात औरंगाबाद जिल्हात आहे.औंरगाबाद वरुन 100 -११० कि.मी अंतरावर अजन्ता गावापासून 3 कि.मी.घनदाट अरण्यात पाहाडाच्या कुशीत वाघुर नदीच्या परिसरात  लेण्या कोरल्या आहेत .ह्या लेण्या बौद्ध कालीन आहे.द्वितीय.ई.स.पूर्व शतकातील व ई.स.पूर्व चोथे शतक असा प्रदीर्घ कालखंड मध्ये निर्मिल्या गेल्या आहेत ज्या मध्ये  29 लेणी डोंगरात कोरलेल्या आहेत.ह्या  लेण्या वाघुर नदी पात्रा पासून ४० - १०० फुटउंचीवर विस्तीर्ण डोगरात कोरलेल्या आहेत   बौद्ध धर्माच्या वारसा जपणारी प्रदीर्घ कालखंडाची पार्श्वभूमीवर लाभलेली अशा  ऐतिहासिक लेण्या आहेत.

          अजिंठा गुफा पाहण्यासाठी शटल बसणे जावे लागते ह्या बसेस विशेषता आहे अजंता गुफाना ध्वनी व धूर आवाज यांच्या पासून नुकसान पोहचू नये म्हणून वापरण्यात येते 

        अजिंठा लेणीच्या पायथ्याशी मोठ -मोठ्या बँनरवर लेण्या विषयी  माहिती व चित्रे लावलेली आढळतात अर्च्लाजिक इंडिया कडून आपले स्वागत होते .

            पर्यटकाना आकर्षित करणारी भरताच्या जागतिक वारसा म्हणून   आंतरराष्टीय ओळख करून देणारी  वास्तू आहे  येथे अजिंठा लेणी जागतिक वारसा म्हणून युनोस्कोने  १९८३ साली घोषित केले आहे  भारतातील  पहिला जागतिक वारसा म्हणून स्थान आहे जून २०१३ महाराष्ट्रतील सात  आचर्यची  घोषणा करण्यात  त्यापैकी  प्रमुख  आ श्चर्य म्हणून मान मिळाला आहे 

           .जागतिक आंतरराष्पटीय पर्यटणासाठी ठळक वैशिष्टे  म्हणून ओळख करून देणारी लेणी आहे.लेण्यांपैकी एका लेणीचे चित्र भारतीय चलनात २० रुपयाच्या नोटीवर पहावयास मिळते अजिंठा लेण्यामध्ये गोतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बोद्ध तत्वज्ञानाला चित्र स्वरुपात शिल्प कलेचा  अविष्कार आपणास येथे पहावयास मिळतो .अशी अजिंठा लेणी देशी पर्यटकासोबत प्रामुख्याने विदेशी पर्यटकाना अधिक  आकर्षण ठरलेले आहे.चित्र व शिल्प कलेच्या निन्तांत सुंदर अनुभव देणाऱ्या  या लेण्यामधून  त्या काळात वापरण्यात आलेल्या विविध रंगाच्या छटा आपणास पहावयास मिळते .ह्या लेण्याचा शोध मद्ररास इलाख्यातील ब्रिटीश   अधिकारी  जा ँन  स्मित वाघाची शिकार करण्यासाठी गेला होता २८ एप्रिल १८१९ रोजी या लेण्याचा शोध लागला.

              अजिंठा लेणी हि पुरात्त्व विभागाच्या पुराव्या नुसार  हि लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली असावी ९ ,१० १२,१३ व १५  अ हि लेणी हीनयान कालखंडात कोरल्या गेली असावी हा कालखंड ई.पूर्व दुसर्या शतकाच्या सुमारास सुरु झाला ह्या सर्व लेण्यामधून बुद्धाचे दर्शन स्तूप रूपांमध्ये होते .भयाण लेणी हि वाकटक राज्याच्या राजवटीत निर्मिली गेली त्यामुळे त्यास वाकटक लेणी म्हणून संबोधले जाते.वाकटक राज्याच्या -रासा नतर लेण्याचे काम थांबले हि लेणी योजित भवत्तेपासून  वंचित राहली अनेक चीनी पर्यटक पर्यटनासाठी आले असता  अकबराच्या काळात उपलब्ध असलेल्या प्रवसात वर्णनामध्ये या लेण्याचा उल्लेख केलेला आहे.जंगलाने वेढलेल्या असल्यामुळे ह्या लेण्या अज्ञात होत्या या लेण्या निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे या लेण्याची निर्मिती केली आहे.या लेण्याम्धील भिंती आणि छतावर चितारलेले चित्रावरून बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग आणि अनेक बोद्ध विभूतीचे चित्र आढळते 

जाचक कथा च्या आधरे केलेले कथांचे अंकन येथे दिसून येते शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता प्राप्त आहे.येथे मानवी भाव भावना या चित्राचे  वैशिष्टे आहे.

लेण्याचा शोध 

मद्ररास इलाख्यातील ब्रिटीश   अधिकारी  जा ँन  स्मित वाघाची शिकार करण्यासाठी गेला होता २८ एप्रिल १८१९ रोजी या लेण्याचा शोध लागला.

लेण्याचा कालखंड 

ह्या लेण्या बौद्ध कालीन आहे.द्वितीय.ई.स.पूर्व शतकातील व ई.स.पूर्व चोथे शतक असा प्रदीर्घ कालखंड मध्ये निर्मिल्या गेल्या आहेत
अजिंठा लेणी हि पुरात्त्व विभागाच्या पुराव्या नुसार  हि लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली असावी ९ ,१० १२,१३ व १५  अ हि लेणी हीनयान कालखंडात कोरल्या गेली असावी हा कालखंड ई.पूर्व दुसर्या शतकाच्या सुमारास सुरु झाला

लेण्याची चित्रे पहा 

 लेण्याची वैशिष्टे 

लेणी क्र.१  या लेणीला भक्कम असे खांब आहे प्रवेश द्वारावर अत्यंत सुबक कोरीव काम करण्यात आले आहे आतमध्ये पूजा स्थळी गोतम बुद्धाची ध्यानस्त अशी मूर्ती आपणास पहावयास मिळते या लेणी मध्ये एकूण २० खांब आहे या खांबावर सभा मंडप आहे .त्यावर कोरीव काम करण्यात येवून त्यामध्ये गोतम बुद्धा च्या जीवनावरील आधारित जाचक कथा महात्मा बुद्धांच्या जीवनावर आधारित आहेत पूजा स्थळी बुद्धाच्या मूर्तीवर 
उजव्या व डाव्या बाजूस प्रकाश  झोत टाकल्यास गम्भीर ध्यानस्त असलेली मूर्ती आपणास पहावयास मिळते .

लेणी क्र २  या लेणीचे वैशिष्टे म्हणजे या लेणी मध्ये जन्माची कथा दर्शविण्यात आलेली आहे.बुद्धाची माता  आपले स्वप्न राज्यास सांगत आहे बुद्धाचा जन्म आणि माता पिता त्यांच्यावर प्रेम करताना चित्रित करण्यात आलेली आहेत 

लेणी क्र.३ अपूर्ण आहे.

लेणी क्र. ४ या लेणीच्या द्वारावर  द्वारपालाची जोडी दर्शविण्या आली आहे.हि सर्वात विशाल लेणी आहेत या लेणीला २८ खांब आहेत आतमध्ये पूजा स्थळी महात्मा बुद्धाच्या 6 प्रचंड मूर्ती आहेत हे अष्टभयापासून सरक्षण करीत आहे असे दर्शविण्यात आले आहे. 

लेणी क्र.५  हि लेणी अपूर्ण अवस्थेत आहेत  हि लेणी अपूर्ण असण्याचे कारण ह्या लेण्याच्या कामाचा खर्च वाकटक राजा करत असे या राज्य कडून आर्थिक पुरवठा कमी झाल्यामुळे ज्या लेण्या अपूर्ण राहिल्या त्यापैकी हि एक लेणी .

लेणी क्र. 6 हि लेणी दोन मजली आहे ह्या लेणीच्या दालनात बुद्धाची पद्मनाभ मुद्रेत मूर्ती आहे.दुसर्या मजल्यावर सभा


भवनात खांब आहेत प्रवेश द्वारावर मगरीचे व फुलाचे अर्ध गोल आर्च बनविले आहेत 

लेणी क्र.७ या लेणीत बुद्धाची  आसनस्थ स्थानी बुद्धाची मूर्ती असून मागील भिंतीवर प्रभा मंडल कोरण्यात आले आहेत.

लेणी क्र. ८ या ठिकाणी पर्यटन विभागाने विद्दुत गृह स्थापन केलेले आहेत.

लेणी क्र. ९ या लेणी काटकोना मध्ये चैत आकाराच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेल्या अर्ध वर्तुळ आकारात स्तूप आहेत भिंतीवर दिसणारे अस्पष्ट दिसणारे बुधाच्या विविध भाव मुद्राचे क्षण घडवतात 

लेणी क्र.१० हि लेणी एक हिनियान मंदिर आहे. जवळपास ४० खांब आहे.त्या खांबावर कोरीव काम केले आहेत समोर एक स्तूप आहेत त्यावर पाली भाषेत ब्रामनी लिपी मध्ये एक लेख कोरलेला आहे.या लेखावरून असे स्पट होते ह्या लेण्या ई.स.पूर्व दुसर्या शतकात झालेल्या आहेत या लेखात असे दर्शविण्यात आले कि या लेण्याचा दर्शनीय भाग बांबू लाखुड व्यापा -यांनी स्वत: हाच्या जबाबदारी ने काढला होता 

लेणी क्र.११ या  लेणीं मध्ये पहिले तिन मजली आहे वरती भिक्षु ची राहण्याची स्थान व यात्री साठी राहण्याची जागा आहे.खाली मंदिर आहे.दुर्गा व गणपतीची मूर्ती आहे.लेणीचा सभामंडप मोठा आहे.आतील भागात पूजा स्थळी बुद्धाची आकृती आहे.

लेणी क्र. १२ या मध्ये शयन कक्ष आहे व रोचक शिल्प आहे.सात बुद्धची मूर्ती आहे.यामध्ये असे दर्शविण्यात आले आहे कि बुद्ध ५००० वर्ष तून एकदा जन्मास येते आता पर्यंत सात वेळा जन्मास आले आहे 

लेणी क्र. १३,१४,१५  या लेण्यामध्ये फारसे काम केलेले नाही काही अपूर्ण अवस्थेत आहेत 

लेणी क.16 या लेणी मध्ये महत्वपूर्ण चित्रे आहेत पुजा स्थानी बुद्धाची विशाल मुर्ती आहे बुद्धाच्या जीवनातील घटना. लिहिलेली आहेत कथकली नॄत्याचे चित्र येथे दाखवण्यात आले आहे छतावरील चित्र कला सुंदर व आकर्षक आहे.यामध्ये बुद्धाच्या मातेचे चित्र आपले स्वप्न सांगत आहेत व ज्योतिषश त्याचा अर्थ लावत आहे असे दर्शविते आताच्या काळातील 3डी चित्रा प्रमाणे त्याचा प्रभाव जाणवतो.

लेणी क.17 या लेणी मध्ये बुद्धाच्या अनेक आठवणी व जाचक कथा दर्शविते पुजा स्थानी बुद्धाची मूर्ती आहे एका बाजूला बुद्धाच्या पुर्व जन्माचे चित्र एका हत्तीचे चित्र आहे  बुद्ध आपली पत्नी ‌‌यशोधरा व मुलगा राहुल यांच्या कडे भिक्षा मागत आहे असे दर्शविते येथील छत इतके सुंदर असुन असे वाटते की एखाद्या कापडाचे काठ कीनार पट्टी आहे असे भासते एका चित्रांमध्ये असे दर्शविते की हत्ती बुद्धाना मारण्यासाठी आणण्यात आले असुन बुद्ध त्या हत्ती ला अंकुश करते असे दर्शविते.

लेणी क.18 या लेणीत विशेष असे काही नाही

लेणी क.19 या लेणी मध्ये चित्रे आहेत काही चित्रे विस्कळित झाली आहेत.या मध्ये कोरीव खांब आहेत ही लेणी घोड्यांच्या नालिच्या आकाराच्या मंदिर आहे या लेणी तर विविध बुद्धाच्यामुर्ती कोरलेल्या आहेत येथे नागराज्या आपल्या पत्नी समवेत विराजमान दर्शविन्यात आले आहे.


लेणी क.21 या लेणी मध्ये अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे मोठं मोठे. कोरीव खांब आहेत येथे बुद्ध आपल्या शिष्यांना मार्गदर्शन व ज्ञान देताना दर्शविते.


लेणी क.22.23.24 ह्या लेण्या अपुर्ण आहेत.

लेणी क.25 ही लेणी अपुर्ण विहार म्हणून ओळखली जाते या लेणी मध्ये एकही पुजा स्थान नाही कक्ष नाही.

लेणी क.26 या लेणी तर बुद्धाच्या जीवनावरील आधारित दोन चित्रे आहेत पहिल्या चित्रात महापरिनिर्वाण मुद्रेत दर्शविण्यात आले आहे.दुसर्या बाजूला बुद्ध एका वूक्षा खाली बसलेले दिसतात

लेणी क.27,28,29 ह्या अपुर्ण आहेत येथे जाण्यासाठी पायऱ्या नाही.

           अश्या ह्या महाराष्ट्रची शान असलेल्या अजिंठा लेण्या अद्वितीय शिल्प कलेचा नमुना येथे आपणास पहावयास मिळतो जगातील सर्व पर्यटकांना आकर्षित करतो येथे मोठ्या संख्येने पर्यटक शिल्प कलेचा नमुना पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात.अद्भभुत असे खांबावर कोरीव काम व भींतिवरील चित्रे अतिशय सुंदर आहे.पैठणच्या राज्या कडून या लेण्याच्या कामांकरिता आर्थिक पुरवठा होत असे काही लेण्याची कामे आर्थिक पुरवठा न झाल्याने काही लेण्याची कामे अपूर्ण राहिली.


Thanks for watching








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या