💠 समुह गीत 💠 |
प्रभू माझी, जीवनबाग फुलव कुशल तू माळी, बाग सांभाळी स्वर्गीय सौंदर्य, तेथे खुलव ॥ ध्रु ।। गतकाळातील, सगळी खळखळ भरपूर येथे, खगाला उडव ।। १ ।। द्वेष-मत्सर, हेची पत्थर, फोडोनी, प्रेमाचे वृक्ष फुलव ॥ २ ॥ काम-विकार, बाग खाणार वैराग्य-दंडाने, त्यांना घालव ॥३॥ दृढ श्रद्धेचे, सद्-भक्तिचे सुंदर मंदिर येथे उभव ॥ ४ ॥ उत्साहाची, आनंदाची, चारित्र्याचे, पावित्र्याची थुई थुई कारंजी, येथे उडव ॥ ५ ॥ शीतल शांतसे, कुंज घडव || ६ || बाग फुलवुनी, तेथे नीवसोनी, गोडगोड मग, वेणू वाजव ॥ ७ ॥ साने गुरुजी |
खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥धृ०॥ जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित तया जाऊनि उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ १ ॥ सदा जे आर्त अति विकल जयांना गांजती सकल तया जाऊनि हसवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ २ ॥ कुणा ना व्यर्थ शिणवावे कुण ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधू मानावे । जगाला प्रेम अर्पावे ||३|| प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ॥४॥ असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ साने गुरूजी |
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog