Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

महाराष्ट्रातील जिल्हाची नावे कशी पडली /महाराष्ट्रातील जिल्हाची नावे

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
महाराष्ट्रातील जिल्हाची नावे कशी पडली : -
             
                         आपण पाहतो ,आपल्या घरात ,आजूबाजूला राहत असलेल्या अनेकच कोणत ना कोणत टोपण नाव असतेच .तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळे नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपण नावे ठेवली जातात .त्याच प्रमाणे भक्कम इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रतील विविध शहरातील नावालाही इतिहास लाभालेला आहे . महारास्त्रातील ३६ जिल्हया पैकि ३० जिल्हाची वेगवेगळी अशी वैशिष्ट आहे "महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याची जुनी नावे "अनेकांना माहित नसेल ह्या जिल्हाची नावे का बदलण्यात आली .त्यामागचा इतिहास काय असेल कशावरून जिल्हाची नावे बदलण्यात आली . महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हे आहेत त्यातील ३० जिल्हाची नावे काळानुसार बदलत गेली .महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील संकेतस्थळच्या माहितीनुसार त्या शहराचा नावाचा उल्लेख केलेला आहे महाराष्ट्रातील ३६ पैकी ३० जिल्हाची माहिती

 
    अमरावती 
    जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील एक महत्वाचे मध्यवर्ती ओंधेगिक केंद्र व ईतिहसिक पर्यटन केंद्र आशी ओळख


    असलेला अमरावती जिल्हा .अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते या जिल्हाचे मुल नाव उमरावती होते त्यानंतर अमरावती असे करण्यात आले .




      ओरंगाबाद जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील ओरंगाबाद जिल्हा हा खांम नदीच्या काठी वसलेला आहे .आजच्या ओरंगाबाद


    जिल्हाचे नाव पूर्वी खडकी होते ,तसेच अहमदनगरचा निजामशाहा मुर्तुजा द्वितीय यांचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे.मल्लिक अंबर याने शहराचे नाव फत्तेह्पूर असे ठेवले होते पुढे मुघल सम्राट ओरगजेब याच्या नावावरून "ओरंगाबाद " हे नाव त्याच्या मुत्युनंतर ठेवण्यात आले कालांतराने ओरंगाबादचे नाव "संभाजीनगर" करण्यात आले परंतु अजूनही ओरंगाबाद हेच नाव प्रचलित आहे.


    बीड जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बीळसारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून  ‘बीड’ हे नाव पडले आहे.



    भंडारा जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्याचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे . भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिद्ध असल्यामुळे भाण शब्दावरून भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर ‘भंडारा’ असे ठेवण्यात आले .

     बुलढाणा जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महराष्ट्रातील जिल्हा हा आजीठ्याच्या डोंगररांगा मध्ये वसलेले . हे  शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते . भिल्लाठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान . त्यानंतर ‘बुलढाणा’ हे नाव पडले आहे .

    चंद्रपूर जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे .

    चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळखत होती . ‘चंद्रपूर’ जिल्हाला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्हात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत .

    धुळे जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील  धुळे जिल्हा हा पूर्वी पच्छिम खानदेश जिल्हा म्हनून ओळखला जात होता गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने फारुकी राजना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरून साजेशे खानदेश असे यांचे नाव करण्यात आले .त्यानंतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला .

    गोंदिया जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्र राज्यच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या शहराला ईतिहसिक वारसा लाभलेला आहे .गोंड समाज हे येथील जुने रहिवाशी आहे.त्याचा उधोग डिंक,मध,आणि लाख गावात आणून विकणे हा आहे यावरून डिंक (गोंद) या नावावरून गोंदिया हे नाव पडले ,गोंदिया हे तांदळाचे शहर म्हणून ओळखल्या जाते .

     हिंगोली जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रतील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली या नावाने ओळखला जात होता ,त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्हाची ओखला जावू लागला .

    जळगाव जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जातो ,पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला हा जिल्हा आजचा जळगाव जिल्हा म्हणून ओखला जातो.

    जालना जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किना-यावर वसलेला आहे हे मराठवाड्यातील एक म्हत्वाचे व्यवसायिक क्रेन्द्र आहे.सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराचा इच्छेने त्याला या ठिकाणी खूप फायदा झाला .त्याचा विणकामाचा [जुलाह ]हा व्यव साय होता .त्यामुळे जुलाह वरून जालनाया नावाने ओळख सुरु झाली .

     कोल्हापूर जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर,महालक्ष्मी मंदिर स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतर अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसमत असे नाव कोल्लापूर होते ,पूर्वी कोला नावाच्या एका असुराचा महालक्ष्मीने वध केल्यानंतर या शहरास कोल्हापूरया नावाने ओळखण्यास सुरवात झाली,असे म्हटले जाते शहराला करवीर ही म्हटले जाते .

     लातूर जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते .त्यानंतर त्या नावात बद्दल करून लातूर या नावाने ओखळ निर्माण झाली.

     मुंबई जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्राची राजधानी मुबई म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो,तसेच हा जिल्हा सात बेटाचे शहर म्हणून ओळखला जातो ,तसेच या शहराला भारताचे हॉलीवूड असेही म्हटले जाते .मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बाधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे .त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी यांचे एकत्रीकरण होवून मुंबई हे नाव देण्यात आले .

     नागपूर जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा हा क्न्न्हान नदीची उपनदी नागनदी नागासारखी वाहत असल्याने पूर्वी या शहराला नाग असे नाव पडले आणि या नागनदीमुळे नागपूर असे नाव ठेवण्यात आले .तसेच अनेक शहराचे नावापुढे पूर हे नाव लावले जाते त्यापद्धतीने नाग या नावापुढे पूर लावून नागपूर अशी ओळख निर्माण झाली .

    नंदुरबार जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा हा धुळे जिल्हातून नव्याने निर्माण झाला,नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार या उत्तर महाराष्टीय परिसराला पच्छिम खानदेश असे म्हटले जात असे .

    नाशिक जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावानी ओळखला जातो ,नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलाचे नगर होते .तसेच सुरवातीचे नाव त्रींकटक होते ,तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखराचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्हास हे नाव देण्यात आले,तसेच पौराणिक काळात चौदा वर्ष राम लक्ष्मणचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला ,त्यावेळेस लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षनिनेचे नाक कापले होते ,संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात ,म्हणून या शहराला नाव नासिक असे पडले आहे.

    उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    ,महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हाची भूमी ही श्रीराम वनवासात  असताना त्याच्या पदस्पर्शानेपावन झालेली भूमी मानली जाते ,या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धराशिव असे होते ,त्यानंतर 20 व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान आली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबादअसे नाव दिले आहे.

     परभणी जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मन्दिराव्रून या जिल्हास परभणी असे नाव देण्यात आले.

    पुणे जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विधेचे माहेरघर या नावाने ओळखले जाते .तसेच राष्ट्रकुट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते .पुण्य या शब्दावरून पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सागण्यात येते .

    रायगड जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील रायगड जिल्हा हा मराठ्याचा इतिहासासी निगडीत आहे रायगड जिल्हाचे पूर्वीचे नाव  कुलाबा हे नाव होते .श्री.छत्रपती शिवरायाची राजधानी रायगड किल्ला हा याच जिल्हात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण रायगड असे करण्यात आले आहे.

     सांगली जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरवात सांगली पासून झाली .त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्य पंढरी या नावानेही संबोधले जात होते .

     सातारा जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील सातारा जिल्हास तेथील असलेल्या सतरा बुरूजामुळे सातारा हे नाव पडले तेथील किल्ल्याचे मुळ नाव सप्तश्री किवा सातदरे असे होते ,त्यांनतर पुढे साताराझाल्यामुळे त्याची असी ओळख प्रचलित झाली आहे.

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव  दक्षिण रत्णागिरी होते .मालवणच्या किना-यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.

     सोलापूर जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शिवयोगी श्री.सिध्देश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते .त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव  सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे.म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर चपळदेव ,फत्तेपूर ,जामदरवाडी ,काळजापूर ,चादरपूर ,खांडेकरवाडी ,महमदपूर ,राणापूर ,संदलपूर ,शेखपूर ,सोलापूर,सोन्नलगी ,सोनपूर,व वैदकवाडी या सोळा गावाच्या एकत्रीक नावावरून  सोळापूर हे नाव प्रचलित झाले ,

    ठाणे जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते सागरी,डोगरी आणि नागरी अशी रचना या जिल्ह्याला लाभली आहे .सर्वात ज्यास्त महसूल देणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळ्ख आहे.ठाणे जिल्हात सर्वात ज्यास्त धरणे आहेत .

    वर्धा जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव जवळून वाहन-या वर्धा नदीच्या नावावरून वर्धा जिल्हाची ओळ्ख निर्माण झाली .

     वाशीम जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील वाशीम जिल्हास प्राचीन इतिहास लाभलेला आहे,वाशीम जिल्हाचे प्राचीन नाव वात्सुगाम होते.प्राचीनकाळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरून वाशीम हे नाव पडले असे म्हटले जाते.

     यवतमाळ जिल्ह्याचे नाव कशावरून पडले

    महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वनी किंवा ऊन या नावाने ओळखला जात असे त्यानंतर  या जिल्हाचे नाव यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश या वरून यवतमाळ हे नाव प्रचलित आले,

    अकोला जिल्ह्याचे नाव कशावरून पडले 

    महाराष्ट्रातील अकोला या शहरास पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबध आला त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगच्या नावावरून अकोलाहे नाव प्रचलित झाले.

             सादर जिल्ह्याची नावे  त्या जिल्ह्याच्या  भोगोलिक स्थितीवरून  पडले .

     Thanks For  Waching

    टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या