Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

nokari and svayam rojgar,नोकरी की स्वयंरोजगार

     

                  नोकरी आणि स्वयंरोजगार यांचा प्रथम विचार करू जीवनात चरितार्थ चालविण्यासाठी आपले आयुष स्थिर होण्यासाठी  दुस-याची ताबेदारी  करतो ती नोकरी ,आपल्या स्वत;हाच्या पायावर किवा हिमतीवर उभे राहून उद्योग -व्यवसाय करतो त्याला स्वयम रोजगार म्हणतात स्वयम रोजगार मध्ये स्वत:हाच मालक ,चालक असतो .कोणाची गुलामगिरी करण्याची आवश्यकता नसते.स्वयंरोजगार मध्ये स्वत:ची मर्जी प्रमाणे वागता येते .स्वत:हा निर्णय घेता येतात ,नोकरी मध्ये स्वातत्र्य नसते आपण नोकर म्हणूनच काम करावे लागते वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते .



              सध्याची परिस्थिती पाहता नोकरी मिळणे कठीण झाले आहे .शिक्षणावरील वाढता खर्च वाढती बेरोजगारी या मुळे सध्या तरी आपण स्वत:हाच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार ,स्वतत्र व्यवसाय ,उद्योग धंदा हाच पर्याय आहे.

    लोकसंख्या :

                   बेरोजगारी वाढण्याची कारणे म्हणजे दिवसेदिवस बेशुमार  वाढत जाणारी लोकसंख्या भारताची लोकसंख्या सुमारे १.३६ कोटी इतकी झालेली आहे.हि लोकसंख्या आपला आक्राळ -विक्राळ रूप दिवसेदिवस धारण करत आहे.त्यामुळे देशाच्या अर्थचक्राला आळ बसलेला आहे .दरवर्षी बेरोजगारीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.बेरोजगारीच्या मानाने रोजगार कमी आहे त्यामागील महत्वाचे कारण वाढती लोकसंख्या आहे.


    लोकसंख्येमुळे बेरोजगारी होते काय ?

                वाढती लोकसख्या हि गंभीर बाबा आहे.परंतु लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी वाढली ,दरिद्री वाढली ,प्रगतीला खीळ बसली हे म्हणणे कितपत योग्य आहे.केवळ लोकसंख्या पाहून चालणार नाही तर .तिची गुणवत्ता काय आहे.हेही पाहावे लागेल .तसे पाहता गुणवत्ता असेल तर रोजगार मिळणे कठीण नाही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवू शकतो त्यासाठी गुणवत्तता वाढविण्यावर भर दिला पाहिजे .गुणवत्तेच्या जोरावर देश-परदेशात सुध्दा रोजगार उपलब्ध आहे.प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेला प्राधान्य आहे.प्रत्येक व्यक्तीने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे .प्रत्येकाने स्वता:हाची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले तर देश कोणत्याही क्षेत्रात मागे राहू शकणार नाही.आपण दुस-यावर अवलबून न राहता स्वत:हा गुणवत्तेतून स्वत:हाच व्यवसाय निर्मितीला चालना देवून स्वत;हा उद्योग व्यवसाय सुरु करावा .

    निरक्षरता 

               नोकरी व स्वयंरोजगाराच्या संदर्भात निरक्षरतेचा विचार करणे गरजेचे आहे.देशाच्या प्रगतीसाठी देशातील जनता साक्षर असणे गरजेचे आहे.देशातील जनताच जर निरक्षर असेल तर त्या देशाची प्रगती होत नाही.देशाची प्रगती न होणे मागील  निरक्षरता हे त्या मागचे कारण आहे.निरक्षरते मुळे निरक्षरतेच्या विषयाबाबतीत सुशिक्षित. उदासीन आहे.आणि रोजगार मिळवण्यासाठी या देशात माणूस साक्षर असावा लागतो.असे दुर्दैवाने वाटेनासे झाले आहे.

    स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळातील नोकरी व स्वयंरोजगार

                   स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात नोकरी व स्वयंरोजगार यांची परिस्थिती कशी होती.व आज कशी आहे.शिक्षण विषयक दृष्टीकोण ठरविताना प्रत्येक देशाने आप-आपल्या गरजा आपली कुवत आपल्या समाजाजी धारणा यांचे भान ठेवले गरजेचे असते.यांचे भान आपण ठेवले नाही.इंग्रजानी घालून दिलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा की त्या आपण गिरवत आहोत.व्यापारी वृत्तीच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी आपल्या देशाच्या गरजा कधीच लक्षात घेतल्या नाहीत.त्यांना आपला राज्यकारभार इंग्रजीतून चालविणारे कारकुन हवे होते.ते त्यांनी निर्माण केले.त्यामुळे स्वतंत्र धंदा व्यवसा
    य स्वातंत्र्यपूर्व काळात जानुबुजुन दुर्लक्षित केला गेला.
                  स्वातंत्र्योत्तर काळात सहाव्या पंचवार्षिक काळात लघुउद्योग क्षेत्रात प्रचंड वाढ झाली.या पंचवार्षिक काळात लघुउद्योग क्षेत्रामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली.आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा लघुउद्योग हा एक महत्त्वाचा भाग आहे.तरी महाराष्ट्रातील लघुउद्योगाची परिस्थिती अशी आहे.की मुंबई पुणे परिसरात औद्योगिक साम्राज्य एकवटल्यामुळे बाकी उर्वरित जिल्हे अविकसित राहीले.त्यातही नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर शहराभोवती झालेली थोडीशी प्रगती सोडली तर उर्वरित महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या मागासलेला राहिला.जर उर्वरित जिल्ह्यांत औद्योगिक विकास झाला तर मोठं मोठ्या शहरांकडे बेरोजगाचा लोंढा बर्याच प्रमाणात कमी होईल.

    स्वतत्र व्यवसाय 

                  आज भारतात बेकारीचीलाट दिसून येते .त्यामुळे उधोग धंदा किंवा व्यवसाय सुरु केला तर तो यशस्वी होतो कि नाही यांची धास्ती भारतातील तरूण बेरोजगारांन मध्ये दिसून येते .व्यवसाय सुरु करण्याचे धाडस आजच्या तरूण वर्गा मध्ये पहावयास मिळत नाही म्हणून तो स्वंतत्र व्यवसाय सुरु न करता नोकरीच्या शोधात असतो उत्तम नोकरी कनिष्ट व्यापार ही भावना महाराष्ट्रातील तरूणा मध्ये पहावयास मिळते .नोकरी ही जवळच असायला हवी परप्रांतात जायला मराठी माणसाची तयारी नसते चार पैसे कमी मिळाले तरी चालेल आता मात्र मराठी माणूस उद्योग धंद्यात १५-२० वर्षात पाय रोवायला सुरवात होताना दिसत आहे.त्याचे कारण म्हणजे नोकरीत होणारी पीछेहाट तसे पाहता दुसर्याची ताबेदारी करून नोकरी करण्यापेक्षा स्वत:हाच व्यवसाय करणे हेच उत्तम आहे..नोकरी मध्ये लिमिटेड पैसा मिळतो पण व्यवसायात धाडस,जिद्द,मेहनतीच्या जोरावर व्यवसाय भरभराटीस नेवून नोकरी पेक्षा जास्त कमवू शकतो 
                 आता व्यवसाय निवडायचा म्हणजे त्या व्यवसायाचे ज्ञान अवगत करणे आवश्क आहे .नुसतेच आवांतर ज्ञान आजच्या काळात कमी पडणार नाही .व्यवसाय निवडताना त्या व्यवसायबद्दलचे ज्ञान असणे हे आजच्या काळाची गरज आहे.व्यवसाय करताना मार्केटिंग चे कशा प्रकारे करता येईल यांचे विचार करणे गरजेचे आहे.
                 इंजीनियरिंग क्षेत्रातील पदवीधर व पदविका प्राप्त झालेले इंजिनीअर फार मोठ्या अपेक्षा बाळगून असतात .मोठ-मोठ्या नोकरीची अपेक्षा करतात .नोकरी प्राप्त न झाल्यास निराश होतात पण निराश न होता आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवसाय निर्मितीसाठी  जर केलात तर यशस्वी व्यवसाय सुरु करू शकतो व्यवसाय हा लहान असो पण सुरवात हि महत्वाची असते.
                या पुढे नोकरीचे प्रमाण दिवसे-दिवस कमी होत आहे.असे झाले तर आर्थिक  आणि सामाजिक विषमता नर्माण होईल .या पुढे नोकरीचे प्रमाण खूपच कमी होत जाणार आणि स्वयंरोजगाराची कास धरावी लागणार.

    व्यवसायाची निवड 

    आज तरुणांना नी आपल्या गुणवत्तेच्या मर्यादा ओळखने गरजेचे आहे.अर्थात भीतीने नव्हे की आकांक्षांना मुरड घालून नव्हे, परंतु काहीच न वाचणारे याने यंत्र हाताळले तर हाताला काळे लागेल म्हणून काम बाजुला मारण्याचे दिवस आता संपले आहे.व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसाया विषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.त्या व्यवसाय विषयी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावा जे पाॅडक्स तयार केले त्याचे मार्केटिंग यांची माहिती असने आवश्यक आहे.असे कीर्ती तरी लघुउद्योग आहे.सध्या इंटरनेटच्या माध्यमातून लघुउद्योग धंद्याची माहिती सहज उपलब्ध होते.चिनंतन मनन करून तरूणांना नी अजिबात निराश न होता आपल्या आवडत्या व्यवसाय क्षेत्रात उत्साहाने पाऊल टाकुन कर्तुत्व पणाला लावून जिद्दीने जिवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल असणे गरजेचे आहे.

           तरी तरुणांनी सामोपचाराने प्रश्न सोडवून आपल्या मनोवृत्तीत स्वयंरोजगाराच्या दुष्टीने बदल केला पाहिजे.आजच्या तरूणांना हे आव्हान असून ते त्यांनी स्विकारले पाहिजे.जपानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.आजच्या काळात तडजोड हे महत्वाचे सुत्र आहे.तेव्हा तरुणांनी निराश न होता आपल्या आवडत्या व्यवसाय क्षेत्रात उत्साहाने पाऊल टाकले पाहिजे.आपले कर्तुत्व पणाला लावून जिद्दीने जिवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल राहिले तर त्याचा स्वतःचा विकास पर्यायाने देशाचा विकासाला निश्चितच   हातभार लागेल.

    Thank for watching       

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या