Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

विक़म साराभाई यांची माहिती/एक महान शास्त्रज्ञ

    भारताच्या इतिहासात आपला ठसा उमटविणारे ,भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्र विक़म साराभाई ते अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

पूर्ण नाव : विक्रम अंबालाल साराभाई 

जन्म : १२ ऑगस्ट १९१९  अहमदाबाद 

मूत्यू : ३० डिसेंबर १९७१ केरळ राज्यात कोबालम

प्राथमिक शिक्षण

              विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सदन संपन्न कुटुंबात १२ ऑगष्ट १९१९ ला झाला.त्याचे वडिल एक उद्योगपती होते.त्याचे राजकीय व्यक्ती शी संबंध असल्याने जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे असतं विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या आठ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः ची मांटेसरी पध्दतीची शाळा काढली याच शाळेत विक़म साराभाईचे शिक्षण युरोपातुन आलेल्या शिक्षकांव्दारे झाले.त्यांना गणित व भौतिकशास्त्र हे विषयात विशेष आवड होती.

उच्च शिक्षण

                आपले १२ पर्यंतचे शिक्षण घेऊन १९३६ साली उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये केंब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला.परंतु दुसरे महायुध्द सुरू झाल्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले.व त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही.रमन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्वीक किरणावर संशोधन कार्य केले.

विक्रम साराभाई यांचा विवाह

             विक्रम साराभाई यांचा विवाह १९४२ साली भरतनाट्यम,कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी झाला.त्यांना कार्तिकेय व मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

विक्रम साराभाई यांच्या कार्याची माहिती

           दुसरे महायुध्द संपल्यावर १९४५ साली विक्रम साराभाई ब्रिटनला गेले .१९४७ साली त्यांनी 'कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन टाॖपिकल लैटीट्युड्स 'वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याच वर्षी ते भारतात परतले.भारतात परत येवून त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे physical research laboratory ची स्थापना केली.हे त्यांचे पहिले पाऊल होते.अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंधक संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली.१९७५ मध्ये पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला.त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्ये केली होती.आर्यभट्टाच्या यशस्वी प्रक्षेपण केल्या नंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले.या प्रक्षेपणात विक्रम साराभाई यांचे अथक परिश्रम ,दुरदुष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्याचा मोलाचं वाटा आहे.
१९६० साली विक्रमने ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर ची स्थापना केली.विज्ञान आणि गणित या विषयात विद्यार्थ्यांची रुची वाढावी व लोकांना या विषयाचे ज्ञान प्राप्त व्हावे हाच या संस्थेचा एकमेव उद्देश होता.अहमदाबाद येथे अहमदाबाद टेक्सटाइल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देण्यासाठी उभारणी केली.पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेंटर फॉर इंन्व्हीराॅन्मेटल प्लॅनिंग अॅड टेक्नॉलॉजी (cept) ही संस्था उभारली.१९६५ साली त्यांनी नेहरू विकास संस्थेची स्थापना केली .भारतात शिक्षण व सामाजिक क्षेत्राचा विकास व्हावा हाच या संस्थेचा उद्देश होता.

विक्रम साराभाई यांना मिळालेले पुरस्काराने व गौरव

        डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले व १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार भारत सरकार तर्फे देण्यात आले.

डॉ.विक्रम साराभाईनी स्थापन केलेली संस्था 

  1. भारतीय युरेनियम  निगम लिमिटेड जादुगडा बिहार 
  2. विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र तीरुवंतपूरम 
  3. कम्युनिटी साइन्स सेंटर अहमदाबाद 
  4. भारतीय प्रबधन संस्थान अहमदाबाद 
  5. भोतिक अनुसंधान प्रयोग शाळा अहमदाबाद 
  6. भारतीय इलेक्ट्रानिक निगम लिमिटेड हैद्राबाद 
  7. परिवर्ती उर्जा सैक्लोटाँन परियोजना कलकत्ता 

मृत्यू

       डॉ विक्रम साराभाई यांचा मृत्यू ३१ डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

                     डॉ.विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यात आपले अमूल्य असे योगदान दिले.म्हणुनच त्यांना अंतराळ संशोधनाचे पितामह व भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणतात.


Thanks for watching




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या