Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतीय स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय यांच्या जीवनावर आधारित माहिती व त्यांचे कार्य

  भारतातील थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय हे पंजाबी भारतीय राजकारणी व लेखक होते.त्यांनचा स्वतंत्र लढ्यात सर्कीय सहभाग होता. ते जहाल मतवादी होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी ननिहाल ढुंढिक जिल्हा फरिदकोट पंजाब मध्ये झाला.त्यांचे वडील लाला राधाकृष्ण जंगराॉव गावचे रहिवासी होते.

सुरुवातीचे जीवन

लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पार्शियनचे शिक्षक होते.त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते.1849 मध्ये लाला लजपतराय यांचा विवाह राधा देवी यांच्याशी झाला.1870 च्या दशकांच्या उत्तरार्धात  त्यांच्या वडिलांची बदली रेवरी येथे झाली
तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लाजपतराय यांचे

 शिक्षण झाले.सुरवातीच्या आयुष्यात राय यांच्या उदार मतवादी विचार आणि हिंदूत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील अतिशय धार्मिक व आई यांच्या मुळे तयार झाला.1880 मध्ये लाला लजपतराय यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथे सरकारी महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतला.येथेच ते देशभक्त व स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला.
व ते आर्य समाजाचे सदस्य बनले.लाहोर स्थित आर्य गॅजेट्स चे
संस्थापक व संपादक बनले.
     हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभा मध्ये सामील झाले.त्यामुळे त्यांना नौवजवान भारत सभेच्या टिकेला समोरे जावे लागले.कारण हि सभा धर्मनिरपेक्ष नव्हती.भारतीय उपखंडातील हिंदू जिवनपध्दतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.1884 मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोमँटिक येथे झाली.आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय त्यांच्या सोबत आले.1886 मध्ये वडिलांच्या बदली बरोबर हिस्सारला आले.आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.बाबू चुडामणींसह राय हिस्सार घ्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
    लाहानपणापासून देशसेवा करण्याची राय यांची इच्छा होती.त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली.त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हिस्सार
जिल्हा शाखा स्थापन केली.तसेच चुडामणी,चंदुलाल तयाल, हरिहर तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधु, डॉ रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य समाजाची स्थापना केली.काॅग्रेसच्या अहालाबाद येथील राष्ट्रीय अधिवेशनात हिस्सा र जिल्हा चे प्रतिनिधित्व करण्यासाठी 1888आणि 1889 मध्ये निवड झाली.1892 मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वांतत्र मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारीता करत.त्यांनी व टिॢब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.1886 मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल, लाहोरची स्थापना करण्यास मदत केली.भारताच्या 1947 साली झालेल्या फाळणी नंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया काॅलेज लाहोर मध्ये झाले.
        1914 मध्ये स्वतंत्र लढ्यात योगदान देण्यासाठी लजपतराय यांनी वकिलीला रामराम ठोकला.1914 मध्ये ते इंग्लंडला गेले आणि नंतर अमेरिकेला गेले.ऑक्टोबंर 1917 मध्ये त्यांनी न्युयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लिंगची स्थापना केली.

लाला लजपतराय यांच्या कार्याची माहिती

त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. लाला लजपतराय यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाल्यानंतर आणि पंजाब मधील राजकीय निर्देश नात भाग घेतल्या नंतर ते 1907 मध्ये कोणताही खटला न चालवता लाला लजपतराय रायाची मंडाले ब्रम्हदेशात रवानगी करण्यात आली.पण त्यांना अटक करण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लाॅर्ड मिंटो यांनी ठरविल्याने नोव्हेंबर मध्ये त्यांना परत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.1920 साली कोलकत्ता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
   1921 मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या"ना नफा"तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली.फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलविण्यात आले.भारतभर या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.
सायमन कमिशनच्या विरूद्ध निदर्शने
    1928 मध्ये भारतातील राजकीय ‌‌‌परिस्थितीबाबत अहवाल देण्यासाठी सर जाॅन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला कारण या आयोगाच्या सदस्या मध्ये एकही भारतीयांचा समावेश नव्हता.या आयोगा विरूद्ध भारतात निदर्शने झाली.30 ऑक्टोबर 1928 रोजी जेव्हा या आयोगाने लाहोर येथे भेट दिली, तेव्हा त्या विरुद्ध मुक निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले.पोलिस अधिक्षक जेम्स स्काॅट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊनही लाला लजपतराय यांनी जमावा समोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या  त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या  शेवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील "असे मी जाहीर करतो असे त्यांनी म्हटले.

लाला लजपतराय यांचा मृत्यू

    निदर्शन करतांना झालेल्या लाठी हल्ल्यातुन लाला लजपतराय बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या झटक्याने 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.

लाला लजपतराय यांनी लिहिलेली पुस्तके

यंग इंडिया
द कलेक्टेड वक्स॑ ऑफ लाला लजपतराय,
 लाला लजपतराय रायटिंग ॲड स्पिचेस मॅझिनी,
गॅरीबाल्डी, शिवाजी महाराज यांची ऊर्दू भाषेत लिहिलेले संक्षिप्त चरित्रे, श्रीकृष्ण आणि त्यांची शिकवण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या