Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

आजची शिक्षणपद्धती व बेरोजगारी

          आजची शिक्षणपद्धती शाळेमध्ये शिकविले जाणारे विषय त्यापासून मिळणारे ज्ञान कितपत मुलांच्या मनात रूजतय व त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या उपजिवीका करण्यासाठी कितपत उपयोगी पडतात आज तरूणांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ज्ञानाची गरज आहे पण आयुष्यात जिवन जगण्या करीता रोजगाराची आवश्यकता आहे.जिवनात शिक्षणाचे महत्त्व आहे "शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे" आजच्या काळात जो शिकेल त्याच्या तोच टिकेल पण आजच्या शिक्षणपद्धती  मध्ये शिकविले जाणारे विषय त्यापासून जे ज्ञान प्राप्त होईल त्यांचा रोजगार मिळवण्यासाठी कितपत उपयोग होतो हेही आजच्या काळात व देशात दिवसे -दिवस वाढत जाणारी बेरोजगारी यावर  विचार करणे गरजेचे आहे.हुशार मुलं आजही आपल्या विद्वत्ते मुळे अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत त्यांना रोजगार सहज उपलब्ध होत आहेत.पण सर्वांनाच रोजगार मिळेल काय? उत्तर येते नाही . सर्वच मुलं हुशार नसतात सर्वांची बुध्दीमत्ता सारखी नसते . सर्वांनाच रोजगार मिळेल यासाठी आज शिक्षण प्रणालीत बदल करणे ही काळाची गरज आहे.आज जपानचे उदाहरण आपल्याला डोळ्या समोर ठेवू.आज आपल्या स्वयंरोजगार निर्मिती वर अभ्यासक्रम आणणे गरजेचे आहे. 

आजची शिक्षणपद्धती व शिकविले जाणारे विषय

              आजच्या शिक्षणप्रणाली मध्ये शिकविले जाणारे विषय त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान,भुगोल, इतिहास, इत्यादी आज प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांना वरील विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.परंतु मुलांच्या बौद्धिक विचार करणे गरजेचे आहे.पण तसे होताना दिसत नाही.मुलाचा कल कोणत्या विषयाकडे आहे.त्याचे अवलोकन करून ज्या विषयात त्या मुलाची रूची आहे त्यानुसार त्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.पण तसे पाहावयास मिळत नाही.आज इतिहास विषय शिकवत आहे.मुलांना इतिहास माहीत असावा पण प्राथमिक शिक्षणा पर्यंत ठीक आहे मुलांना इतिहास विषयाचे ज्ञान असावे . माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण शिकताना मुलांच्या सुप्त गुणांचा विचार करून ज्या विषयात विद्यार्थ्यांची आवड आहे त्यांच्यासाठी टेक्निकल नाॅलेज व्यवसाय विषयी माहिती 

आजच्या शिक्षणप्रणाली मध्ये बदल करणे काळाची गरज आहे

              आजची शिक्षणपद्धती शिकविले जाणारे विषय हे माहीती, तसेच इतर अनेक गोष्टी साठी उपयोगी पडतेच. पण या विषयावर पण काही असे विषय आहे ज्यांच्या आपल्या जीवनात, कार्य शेत्रात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. जसे business, shear market, competitive exam, environmental studies,  etc. असे खूप विषय आहे ज्यांना जास्त महत्व देणे आवश्यक आहे तसेच आपल्या परंपरा, आपले सविधन, संस्कृती ला पण सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे. आज इंग्लिश भाषेला प्राधान्य दिले जाते. पण आपल्याला इंग्लिश नव्हे तर मराठी, हिंदी, या भाषेला महत्व देणे महत्वाचे आहे.आज असे किती विद्यार्थी आहे. ज्यांना मराठी हिंदी फ्कत बोलता येते. आजची शिक्षणपद्धती मध्ये व्यवसायिक शिक्षण देण्याची गरज आहे.

रोजगार निर्मिती 

       भारत देश हा ८०%कृषी प्रधान आहे खेड्यात प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले जाते.त्यामध्ये जोड धंदा म्हणून व शेळी पालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, इत्यादी व्यवसायाकडे पाहिले जाते.पण आज कृषी क्षेत्रात अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकेल.शेती व्यवसायाला चालना देणे गरजेचे
आहे.आपणास लिहण्याची आवड असेल तर एक चांगल्याप्रकारे  blog लिहून आपण पैसे कमावू शकतो तसेच  youtub, व्दारे सुध्दां पैसे कमवता येतात.जिद्द आणि मेहनतीची जोड असायला हवी.त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात मध्ये 
व्यवसायिक शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.
             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या