Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

संत गाडगे महाराज, गाडगे महाराजांचा जिवनपट, गाडगे महाराजांचे कार्य

             गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिपराजी जाणोरकर असे होते . अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या ठिकाणी २३ फेब्रुवारी १८७६ एका परीट जातीच्या कुटुंबात झाला . त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखुबाई असे होते . डेबूजीच्या वडिलांचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला . सर्व शेतजमीन दारूच्या व्यसनात सावकाराकडे गेली . त्यानंतर पुढे सखुबाईनी डेबुला त्याच्या मामाकडे केले . तेथे डेबूजीचा विवाह धनाजी खल्लारकर यांची कन्या कुताबाई हिच्याशी 

★गाडगे महाराज परिचय

  • नाव : डेबुजी झिंपराजी जानोरकर
  • जन्म :२३ फेब्रुवारी १८७६
  • मृत्यू :२० डिसेंबर १ ९ ५६ रोजी झाला
  • वडिलांचे नाव :झिंपराजी‌ जानोरकर
  • आईचे नाव: सखुबाई झिंपराजी जानोरकर

★गाडगे महाराजांचे कार्य
            महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र या प्रदेशांतील निरनिराळ्या गावी ते  अंगावर फाटकी गोधडी आणि अन्न व पाणी घेण्यासाठी हातत गाडगे असतं म्हणून लोक त्यांना ' गोधडी महाराज ' किंवा ' गाडगे महाराज ' म्हणत , आपल्या समाजातील अज्ञान , भोळ्या समजुती व अनिष्ट रूढी परंपरा दुर करण्यासाठी त्यांनी कठोर प्रयत्न केले . त्यासाठी त्यांनी किर्तनातुन लोकजागृतीचा मार्ग अवलंबला .म्हणजे खेड्यापाड्यांतील अज्ञानी देवभोळ्या जनतेला भजन - कीर्तनासारख्या मार्गाचा अवलंब केला .त्यानी अनेक गावात संचार केला . त्यांनी यासाठी कीर्तनाच्या मार्गाचाच अवलंब करण्याचे कारण विशेष आकर्षण वाटत असे . त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचा तोच प्रभावी मार्ग होय , असा विचार त्यांनी केला .  माणसाने लबाडी करू नये , व्यसने करू नयेत , देवाच्या नावाने पशुपक्षी यांचे बळी देऊ नयेत , गाडगे महाराज कीर्तनातून अतिशय सोप्या व सुबोध भाषेत उपदेश देत . माणसाने जातपात मानू नये , कुणी आजारी पडले तर अंगारेधुपारे न करता डॉक्टरकडे जावे , नेहमी शरीरकष्ट करावेत , चोरी करू नये , कर्ज काढू नये , भूतदया म्हणजे परमेश्वराची पूजा करणे , असा उपदेश त्यांनी दिला . ' देवकी नंदन गोपाला ' हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होय , पंढरपूर , आळदी , नासिक , त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री यात्रेकरूंसाठी गाडगेबाबांनी बांधलेल्या प्रशस्त धर्मशाळा आहेत . या धर्मशाळा गाडगेबाबांनी सर्वसामान्य यात्रेकरूंसाठी बांधल्या बाबा यात्रेच्या ठिकाणी जात पण देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून  यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वैच्छ करीत . त्यांच्या लक्षात आले की , यात्रेला येणाऱ्या गोरगरिबांचे फार हाल होतात . त्यांना उन्हा पावसात उघड्यावर राहावे लागते . म्हणून गाडगेबाबांनी या धर्मशाळा बांधल्या . विदर्भातील ‘ ऋणमोचन ' येथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व पूर्णा नदीवर घाट बाधला . गाडगेबाबा कुठल्याही शाळा - कॉलेजात गेले नव्हते पण तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या तोंडावर होते . समाजातील अज्ञान , अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लोकशिक्षणाचा वसा घेतला ते तुकाराम महाराजांना आपला गुरू मानत व माझा कोणीही शिष्य नाही , असे ते सांगत . आधी काम केल्याशिवाय ते कोणाकडून भाकरी घेत नसत . भाकरी व भाजी हातात घेऊन खात . श्रीमंतानी दिलेली मिठाई , पंच - पक्वान्ने ते गोरगरिबांना वाटून टाकत . 

★विशेषता

*" सिंहाला पाहावे वनात , हत्तीला पाहावे रानात तसे गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात ' . 
* गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते . 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या