Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

झांसीची राणी लक्ष्मीबाई,राणी लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई नेवाडकर

   लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाडकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई एकोणिसाव्या शतकातील झांशी राज्याच्या राणी होत्या हिंदुस्थानात 1857 च्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या उठावातील या एक अग्रगण्य सेनानी होत्या त्यांच्या शैर्याने त्यांना "क्रांतिकारकांची"स्फुरण देवता म्हणतात

राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण परिचय -    

                     एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक मोठमोठ्या राजकीय व सामाजिक उलाढाली झाल्या व उत्तरार्ध हा नवीन सामाजिक व राजकीय घडी बसविण्यात खर्च झाला . राणी लक्ष्मीबाईने पहिले अर्धशतक हे आपल्या अद्वितीय गुणांनी गाजविले . तिचे तेज अलौकिक होते , अग्निशिखेचे होते . तिचा जन्म १८ नोव्हेंबर १८३५ मध्ये बनारस येथे झाला . तिचे मूळ नाव मनकर्णिका . कौतुकाने तिला ' मनू ' म्हणत . तिच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई . त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांच्या आश्रयाला होते.तांबे कुटुंब मुळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते राणी लक्ष्मीबाई धोरणी,चतुर, युध्दात तरबेज,शुर आणि थोर कर्तृत्ववान व नेतृत्व असणा-या राणी लक्ष्मीबाई जन्मत कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तीतीमध्ये वावरल्या होत्या.वाढल्या होत्या.अश्वपरिक्षेचे सर्व मापदंड माहीत असलेल्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या  इ.स. १७४३ मध्ये झाशी संस्थानचे प्रमुख सुभेदार गंगाधरराव यांच्याशी तिचा विवाह झाला . वडिलांबरोबर लहानपणी ब्रह्मावर्त येथे आल्यावर दुसऱ्या बाजीरावांचे दत्तकपुत्र नानासाहेब आणि त्यांचे बंधू रावसाहेब यांच्याबरोबर हसण्याखेळण्यात तिचे लहानपण गेले . ती रावसाहेबांबरोबर घोड्यावर बसायला शिकत होती . शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेत होती . अष्टपैलु असणा-या राणी लक्ष्मीबाईंनी युद्ध शास्त्रात प्राविण्य मिळवले.बाजीरावाच्या पदरी बाळंभट्ट नावांचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते.त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावांचा कसरतिचा वेगळा प्रकार शोधून काढला.मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरिराचे तोल सांभाळण्याचे कसब,काटकर पणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणा-या मल्लखांब विध्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
राणी लक्ष्मीबाई यांचे व्यक्तिमत्त्व
    

राणी लक्ष्मीबाई यांचे जिवनातील घडामोडी

    राणी लक्ष्मीबाई यांचे वैशिष्ट्ये म्हणजे पुरूष प्रधान संस्कृती
 असणा-या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करुन ते म्हणुन त्यांनी पुरूषी पोषाखात वापरण्याचे ठरवले.दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावाना पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईनी स्वत्व जपण्यासाठी केला त्यांनी आपला व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवली.
      गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला पण अवघ्या तीन महिन्यांचा असताना मुत्यू पावला मुलांच्या रूपाने वारसदार मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधरराव या घटनेने दुःखी झाले.त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेवून त्या मुलाचे नाव दामोदर ठेवले. १८५३ मध्ये गंगाधरराव यांचे निधन झाले.

झाशी संस्थान खालसा

    इंस्ट इंडिया कंपनी व्दारे ब्रिटीश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही.असे पुर्वीपासुन झाशीच्या ब्रिटीशांची असणा-या  मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाई यांना वाटत होते.त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत: ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या.या पत्रव्यवहारातुन त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणाआणि खोडसाळपणा उघड केला.एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले.तर पुर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल.परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटीशांबद्दल भरवसा व विश्र्वास वाटेल
का? अशी शंका व्यक्त करून कंपनीला एकप्रकारे आव्हान दिले.कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यानी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धाडस करणा-या राणी लक्ष्मीबाई देशातल्या काही व्यक्तीपैकी एक होत्या.
    परंतु हिंदूस्थानातील संस्थान खाली करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसी ने‌ घेतलेला असल्याने झाशी संस्थान खालसा करण्यात आले.१३ मार्च इ.स.१८५४ रोजी जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला.
             विवाह झाल्यावर ती झाशीची राणी झाली . १८५१ साली तिला पुत्ररत्न झाले . पण अवघ्या दोन वर्षांत राणीसाहेबांचा मुलगा गेला . ह्या धक्क्याने गंगाधरपंत आजारी पडले . त्यांनी गादीला वारस हवा म्हणून नात्यातला ' दामोदर ' नावाच्या मुलाला दत्तक घेतले . थोड्याच दिवसांनी गंगाधरपंतांचा मृत्यू झाला . २० नोव्हेंबर १८५३ मध्ये राणीसाहेब विधवा झाल्या . त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ होते . इंग्रजांविरुद्ध उठाव आणि अतुलनीय पराक्रम इंग्रजांनी तिचा पदोपदी अपमान केला . ७ मार्च १८५४ रोजी झाशी संस्थान खालसा केले आणि तिचा दत्तक वारसही नामंजूर केला गेला . राणीसाहेबांचा संताप अनावर झाला . आणि त्या समशेर उपसून गरजल्या , “ मेरी झाँसी नही दूँगी । ” राणीसाहेबांचे वय जरी लहान असले तरी संस्थानचा कारभार व्यवस्थित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होते . त्यांची दिनचर्या अगदी आखीव होती . भल्या पहाटे उठावे , स्नान करावे . बहुधा शुभ्र चंदेरी साडी त्या परिधान करीत . पूजाअर्चा , पुराणश्रवण झाल्यावर भेटायला येणाऱ्या सरदार , आश्रित मंडळींना त्या भेटत . भोजनोत्तर विश्रांती घेऊन पुरुषवेष धारण करून त्या दरबारात जात . कुशाग्र बुद्धीमुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचे चटकन आकलन होत असे . न्यायदानावर त्यांचा विशेष कटाक्ष होता . दिवाणी व फौजदारी खटले त्या आपल्या बुद्धिकौशल्याने सोडवीत . दर मंगळवारी व शुक्रवारी त्या महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी जात . लक्ष्मीबाई शूर , वीर होत्या . त्यांच्या राज्यात अनेक तोफा व बंदुका होत्या . त्यांना घोडदौडीची आवड होती व त्यांची अश्वपरीक्षाही अचूक होती . त्या काळी सर्वत्र ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध वातावरण संपूर्ण देशात होते .. लोकांच्या मनात आग उसळत होती . दिल्ली , आग्रा , कानपूर , अयोध्या , अलाहाबाद , अंबाला , मीरत , लखनौ , नसीराबाद इ . ठिकाणच्या इंग्रजी सत्ता या देशातून उखडून टाकण्यासाठी हजारो शिपाई तळहातावर शिर घेऊन निघाले होते . त्यांचे नेते नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे होते . नानासाहेबांची बालपणीची मैत्रीण छबेली म्हणजे राणी लक्ष्मीबाई हिनेही स्वदेश , स्वधर्म आणि स्व - बांधवांसाठी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतली . साठ महामानव

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष

४ एप्रिल १८५८ पर्यंत सर ह्यू रोजशी राणीने यशस्वीपणे सामना करून झाशीचे स्वातंत्र्य टिकविले . शत्रुसैन्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले , तेव्हा ब्रिटिश सैन्याची फळी फोडून ती निसटली , बुंदेलखंडात तिने काल्पी व च येथे ब्रिटिश सैन्याशी घनघोर संग्राम केला . राणी इंग्रजांच्या अफाट सामध्यांशी झुंजत होती . झाशीला इंग्रज सैन्याने वेढा दिला होता . या लढाईत कितीतरी माणसे ठार झाली . कित्येक जायबंदी झाले . पण लगेच त्यांच्या जागी दुसरे सैनिक उभे केले गेले . राणी सैन्याला प्रोत्साहन देत असे . जखमींना धीर देई , सतत अकरा दिवस राणीसाहेब झुंजत होत्या . पण झाशीमध्येच लोक फितुर झाले . ओर्ह्य दरवाजा इंग्रजांना फितुरांनी खुला केला . इंग्रजांनी झाशीवर अमानुष अत्याचार केले . तीन हजार लोकांची कत्तल झाली . पण राणीसाहेब घाबरल्या नाहीत . कंबरेला जंबिया व समशेर बांधून अंगावर चिलखत चढवून व पुरुषवेष धारण करून त्यांनी आपल्या किल्ल्याचा निरोप घेतला आणि १०२ मैलांचे अंतर कापून त्या काल्पीला आल्या . तेथे तात्या टोपे भेटले . राणीसाहेबांनी काल्पी शहर झुंजवायला मदत केली . या संग्रामात त्यांनी घोडा भरधाव सोडला . राणीसाहेब दौडत चालल्या होत्या , पण नाल्याच्या रूपाने त्यांचे दुर्दैव उभे ठाकले . घोडा नाल्याला बुजला , अडखळला . इंग्रज सैनिकांनी त्यांच्यावर पाठीमागून वार केला . डावा डोळा बाहेर आला . पुढे छातीवर वार केला , पण तशाही अवस्थेत घाव घालणाऱ्यांना त्यांनी यमसदनी पाठविले . शेवटी त्या घोड्यावरून खाली आल्या . समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते . शरीरात रक्ताचा शेवटचा बिंदू असेपर्यंत इंग्रजांशी त्यांनी झुंज दिली , याचे जिवंतपणी नाहीच , पण मेल्यावरही आपल्या शरीराला शत्रूच्या हाताचा स्पर्श होऊ नये , अशी त्यांची इच्छा होती . त्याप्रमाणे त्या गवताच्या शय्येला आणि गंगादासबाबांच्या झोपडीला आग लावून शत्रूला काही कळायच्या आत १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील ही तेजस्वी दीप्तिमान ज्वाला अग्निज्वालांच्या समवेत स्वर्गारोहण करती झाली . तो दिवस होता १८ जून १८५८. देशाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी चाललेल्या यज्ञात राणीने स्वतःची आहुती दिली . अवघ्या २२ व्या वर्षी ! 

घोषवाक्य -  मेरी झाँसी नही दूँगी । 

 





.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या