Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कांहीं वाक्य

       भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कल्याणकारी कार्य केले.त्यांचे काही अनमोल वाक्ये यामध्ये देण्यात आले आहे.



तुमच्यात उर्जा प्रेरणा ,धाडस, सत्यता निर्माण करणारी काही महामानवाची काही वाक्ये............

१)"शिका...!

    संघटित व्हा...!

    संघर्ष करा....!"

                   - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२) "तुमच्या मताची, किंमत मीठ मिरची इतकी समजू नका . त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते ,मत विकत घेवु पाहण्या इतके कंगाल कोणीच नसेल...."

                - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

३)"लोकांच्या अंगात देवी,भुतं का येतात....,

  नुटन आयझॅक , कोपर्निकस यांच्या सारखे शास्त्रज्ञ का येत नाहीत....?

                - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल......" 

                - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

४) "समता, स्वातंत्र्य , विश्वबंधुत्व या तीन तत्त्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही .

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो ."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

५)"मानसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये .लाज वाटायला पाहिजे आपल्या दुर्गुणांची...."

             - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

६)"प्रज्ञा ,शील ,करूणा , विद्या ,मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले चरित्र बनविले पाहिजे..."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

७)"मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते...."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

८)"जिथे एकता तेथेच सुरक्षितता.."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

९)"काम लवकर करायचे असल्यास मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका..."

                 - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१०)"दैवावर भरोसा ठेवून वागु नका, जे काम करावयाचे असल्यास आपल्या मनगटाच्या जोरावर करा.."

                  - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

११)"आत्मोध्दार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो, तो ज्याच्या त्यानेच करावयाचा असतो..."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१२)"विचार क्रांती झाल्याशिवाय फेरबदल होऊ शकत नाही, आचारात फेर बदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे. अगदी अगत्याचे आहे...."

             - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१३)"माणसा धर्मा करीता नसून धर्मा हा माणसा करीत आहे..."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१४)"सेवा जवळून,आदर दुरुन,व ज्ञान आतुन असावे.."

                - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१५)"जो प्रतिकूल लोकमतला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो..."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१६)"स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्व- सामर्थ्याने संपादन करायचे असतात, देणगी म्हणून ते लाभत नसतात..."

                  - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१७)"ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही विशिष्ट वर्गाला, दुसऱ्या वर्गावर आधिसत्ता गाजवण्याचा अधिकार नाही...."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१८)"माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा...."

             - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१९)"तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा, स्वाभिमान शून्य त्याचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे...."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२०)"आपण मला देव पदाला चढवू नका, एखाद्या व्यक्तीला देव पदावर चढवून इतर आणि त्यांच्या मागे आंधळेपणाने धावत जावे हे मी कमकुवतपणाचे लक्षण मानतो...."

             - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२१)"माणसाने खावे जगण्यासाठी पण जगावे समाजासाठी..."

              - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२२)"दुसऱ्याच्या सुख-दुःखात भागीदार व्हावे हेच खरे शिक्षण आहे..."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२३)"पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रासारखे असावे...."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२४)"नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा...."

               - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२५)"माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा..."

                   - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२६)"जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर, एका नाण्याची भाकर घ्या, आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या... भाकर तुम्हाला जगवील...तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल..."

                  - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

२७)"जुल्म करने वालों से जुल्म सहनेवाला  ज्यादा गुन्हेगार होता है...."!

           ‌      -  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या