Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती/परिचय सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य

       


        भारताचे स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक अशाच एका तेजस्वी पुत्राचे त्यांचे नाव' सरदार वल्लभभाई पटेल '  भारताला स्वातंत्र्य मिळवून संरक्षण , संवर्धन स्वातंत्र्याचे करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन खर्ची घातले त्यात वल्लभभाईंनी अढळपद प्राप्त केले . देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ते तन - मन आणि धनाने झिजले . बार्डोलीचे सरदार वल्लभभाई आपल्या कार्यकर्तृत्वाने ' भारताचे पोलादी पुरुष ' बनले . अशा या तेजस्वी पुरुषाचा जन्म गुजरातमधील करमसद या खेडेगावी एका शेतकरी कुटुंबात झाला . कणखर स्वभावाचा गुण वल्लभभाईंनी आपल्या वडिलांकडून उचलला . त्यांच्या वडिलांचे नाव जव्हेरभाई . ते एक देशप्रेमी गृहस्थ होते . आपल्या देशावर ब्रिटिश लोक राज्य करतात , याबद्दल त्यांचे मन संतापून उठे . वल्लभभाईंच्या आईचे नाव लडाबाई . त्या खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या . त्यांना भारताचे "लोहपुरुष"म्हणतात.

🔹 परिचय 

जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५ 

वडिलांचे नाव:जव्हेरभाई पटेल

आईचे नाव: लडाबाई

 वल्लभभाईंना चार भाऊ आणि एक बहीण होती . त्यांच्या मोठ्या भावाचे नाव विठ्ठलभाई . पुढे या विठ्ठलभाईंनी खूप कीर्ती मिळविली . वल्लभभाईंचे लहानपण खेड्यातच गेले . करमसद गावी त्यांची जमीन होती . त्या काळ्या आईची सेवा करण्यात वल्लभभाईंना खूप आनंद वाटायचा . ते हाडाचे शेतकरी होते . शेतात हिंडता फिरता ते शाळेतही जात होते . गुजराती सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या गावातच घेतले . त्याच्या गावापासून दूर पेटलाद या गावी इंग्रजी शाळा होती . वल्लभभाई त्या शाळेत दाखल झाले . त्यांच्याबरोबर गावची सात - आठ मुले होती . एका भाड्याच्या खोलीत ते सर्वजण राहू लागले . एकत्र स्वयंपाक करून ही मुले विद्येची आराधना करीत मजेत राहात होती . अनेक गोष्टींची कमतरता असली तरी वल्लभभाई कधी कुरकूर करीत नसत . वेळेवर जेवण नाही , अंगावर धड कपडा नाही , की राहायला चांगली जागा नाही , अशा स्थितीत ते विद्येचा गड चढत होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर , साने गुरुजी यांनीही असेच कष्ट भोगले होते . उपासमार आणि कष्ट सहन करीत वल्लभभाईसुद्धा शिकत होते . गरिबीत राहून शिक्षण पूर्ण करीत होते . शिकून सवरून मी मोठा होईन , ही जिद्द मनात ठेवून वल्लभभाई पुढे जात होते .  गावी वल्लभभाईंनी इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . आता कुठे जावे ? नडीयाद या गावी पुढील शिक्षणाची सोय होती . वल्लभभाई आता नडीयादच्या शाळेत जाऊ लागले . येथील शिक्षण फारच कडक होते . सर्वांनी इंग्रजीचा चांगला अभ्यास केलाच पाहिजे , असा दंडक होता . 

🔹शिक्षण

         त्याकाळी मॅट्रिक होणे म्हणजे खूप मोठी कमाई असे मानले जायचे . खेळीमेळीच्या वातावरणात वल्लभभाई त्यानंतर मॅट्रिकची परीक्षा पास झाले . पुढे काही झाले तरी आपण बॅरिस्टर व्हायचे , असे त्यांनी मनाशी ठरविले होते . बॅरिस्टर होणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती . इंग्लंडला जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागायचे ; पण त्यासाठी एवढा पैसा आणायचा कोठून , असा त्यांना प्रश्न पडला . पण त्यांची महत्त्वाकांक्षा जबर होती . त्यांनी एक मार्ग शोधला . आपण साधे वकील व्हायचे . मग खूप पैसा कमवायचा आणि जायचे इंग्लंडला तीन वर्षे हा - हा म्हणता संपली . वहभभाई साधे वकील झाले . ओळखीच्या लोकांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी वकिलीचे ऑफिस थाटले . शाळेत असतानाच वल्लभभाईंचा विवाह झाला होता . गोधा येथे त्यांचा संसार आणि वकिली सुरू झाली .

🔹 जनतेचे कैवारी 

           महात्मा गांधींच्या भेटीनंतर  वल्लभभाईंच्या विचारांचा  कायापालट झाला . त्यांचे जीवन पार बदलून गेले . जनतेचे कैवारी गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पहिली गुजरात राजकीय परिषद भरली . त्यांची सत्त्यावरील अढळ निष्ठा आणि अटळ निश्चय वल्लभभाईंचे डोळे पाहून दिपले . गांधीजींच्या सहवासामुळे ते त्यागी आणि खरेखुरे देशभक्त बनले . गांधीजींचा निर्भयपणा पाहून त्यांच्याविषयी त्यांना अधिक ओढ वाटू लागली . राजकीय स्वरूपाचे प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी गांधीजींनी एक समिती स्थापन केली . गांधीजींची कार्यशैली आणि तळमळ पाहून ते नुसतेच पुढारी नाहीत , याची खात्रीच वल्लभभाईंना पटली . बोलेल तसेच चालणारे , वागणारे ते महात्माच आहेत असे वल्लभभाईंना वाटले व समितीचे चिटणीस म्हणून राजकीय कार्य करण्यास आणि इंग्रजी सरकारशी टक्कर द्यायला ते तयार झाले.त्याचवेळी वल्लभभाई नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले . नगरपालिकेतील इंग्रज अधिकारी फारच उर्मट आणि सत्ता गाजविणारा होता . जनतेच्या कल्याणाची कामे करण्यात तो अडथळा आणायचा . बेकायदेशीर वागून जनतेला त्रास द्यायचा . मग वल्लभभाई गप्प बसले नाहीत . त्यांनी गोऱ्या अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा ठराव मंजूर करवून घेतला . एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला असे कामावरून काढण्याचे धाडस आजवर कोणी दाखवले नव्हते ; परंतु वल्लभभाईंनी ते करून दाखविले . त्या जागी पुन्हा नवीन इंग्रज कमिशनर आला . तोही मिजासखोर निघाला . पगार , भत्ते वाढवून मागू लागला , " पगार , भत्ता वाढवून मिळणार नाही , जमत असेल तर रहा , नाहीतर हवा तो मार्ग वल्लभभाईंनी त्याला खडसावले . तो गोरा धरा . अधिकारी आला तसा निघून गेला . सरदार वल्लभभाई पटेल गो-या अधिका-यांना त्यांची जागा दाखवून लागले.

🔹कार्य

नगरपालिकाच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करू लागले वाटू लागले लोकांच्या उपयोगी पडण्यात जे समाधान , जो आनंद मिळतो तो ऐषारामात लोळण्यात मिळत नाही , याची त्यांना प्रचिती आली . " लोकांची सेवा जनतेची सेवा करण्यात त्रासलेल्या , पाणीटंचाईने दुष्काळाने गांजलेल्या , प्लेगने दु : खी झालेल्या जनतेच्या मदतीसाठी वल्लभभाई अर्ध्या रात्रीसुद्धा धावून जाऊ लागले . जनतेचे अश्रू पुसू लागले . त्यांना धीर देऊ मदत करू लागले . लागले . हवीत गांधीजींसारखे गुरू वल्लभभाईंना जनसेवेचे धडे देऊ लागले . इंग्रज सरकार जनतेवर अन्याय कधी दुर करुन असे त्यांना वाटत.एके दिवसी शेतकऱ्यांची सभा बोलावून त्यांनी शेतकऱ्यांना कोणीही सारा भरु नये असे सांगितले.वल्लभभाईनी अहमदाबाद शहरात हरताळ पाळून मिरवणूक काढली व मग कायदेभंग आंदोलन सुरू केले

🔹 सत्याग्रह

                  वल्लभभाई यशाची एक - एक पायरी अशाप्रकारे चढु लागले  देशात असहकार आंदोलनाचा भडका उडाला .. सगळीकडे परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या . अहमदाबादमधील होळीत वल्लभभाईनी आपल्या घरातील परदेशी कपड्याचा कचरा आणून टाकला . अंगावरचे परदेशी कपडेही त्यात टाकले . वल्लभभाईनी खादी अंगावर चढविली . त्यांची मुलेसुद्धा खादीचे कपडे वापरू लागली . खादी हे दिशभक्तीचे प्रतीक बनले . खादी उद्योग खेड्यातील गोर - गरीब जनतेला संजीवनी देणारा ठरला . अर्धपोटी जनतेला खादीमुळे चतकोर भाकरी मिळू लागली . असहकार आंदोलनाला भरती आली होती . लोक सरकारी नोकऱ्या सोडीत होते . यांन कॉलेजवर बहिष्कार घातस , नगरपालिकारी सरकारी बंधने पाळू नयेत , असे सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितले . 29 “ आमची नगरपालिका जनतेच्या इच्छेप्रमाणे कारभार चालविणार आहे . असे त्यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले त्यामुळे इंग्रज सरकार खवळले . त्यांनी नगरपालिकेच्या शाळांची मदत बद केली . असल्या भेकड उपायांनी वल्लभभाई थोडेच नमणार त्यांनी आपल्या शाळांचा कारभार चालविण्यासाठी स्वतंत्र मंडळ नेमले . या शाळांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले . या कार्याला गांधीजींनी पाठिंबा दिला . मग मात्र सरकार नमले . त्यांनी वल्लभभाईंच्या शाळांना पूर्ववत मदत सुरू केली . बार्डोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची करबंदीची चळवळ सुरू झाली . त्यावेळी वल्लभभाईंचे शौर्य आणि संयम हे गुण दिसून आले . १ ९ २३ साली सरकारने गांधीजींना तुरुंगात घातले . देशभर इंग्रज सरकारने दडपशाहीला सुरुवात केली . वंदे मातरम् म्हणण्यावर बंदी , राष्ट्रध्वज लावण्यावर बंदी " आम्हाला बंधन घालणारे तुम्ही कोण असे त्यांनी इंग्रज सरकारला विचारले. ते काही नाही . आमची डोकी फोडा , 29 घाला . तुरुंगात प्रिय झेंडा राष्ट्रीय मिरवणूक काढणारच असे सर्वांनी ठरविले . ‘ शुरू हुवा है जंग हमारा ' असे मनाशी म्हणत , “ इन्कलाब झिंदाबाद , भारतमाता की जय ' जयघोष करीत भारताच्या अनेक शहरांत राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या तरुणांनी मिरवणुका काढल्या . " असा इंग्रज शिपाई त्यांना लाठीने झोडपत होते ; पण तरुण हातातील झेंडे सोडीत नव्हते . सरकारने अनेकांना पकडून तुरुंगात घातले . मग वल्लभभाई पुढे सरसावले . त्यांच्या योजनेमुळे तब्बल १० ९ दिवस झेंडा सत्याग्रह चालू राहिला . जनतेची , तरुणांची ही एकजूट आणि अफाट जनशक्ती पाहून सरकारने पाऊल मागे घेतले . सरकारने वल्लभभाईंना बोलावून अखेर राष्ट्रध्वज मिरवीत न्यायला परवानगी दिली . गोळ्या घाला . पण आम्ही आमचा सप्ताहात उभारणारच . त्याची अशाप्रकारे झेंडा - सत्याग्रह यशस्वी झाला . वल्लभभाईंच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला . हाती घेत ते तडीस नेत इंग्रज सरकारचा मिठाचा जुलमी कायदा मोडण्याचे गांधीजींनी ठरविले . १२ मार्च १ ९ ३० रोजी सत्याग्रहींना घेऊन मिठाचा कायदेभंग करण्यासाठी गांधीजी दांडीला निघाले . वल्लभभाई आता गांधीजींचा उजवा हात बनले होते . त्यांचे कार्य नेटाने चालविण्यास ते अग्रेसर होते . हजारो सत्त्याग्रहींना घेऊन ते गांधीजींच्या सत्त्याग्रहात सामील होणार होते ; पण त्या आधीच सरकारने त्यांना पकडून तुरुंगात टाकले . सरदारांना तुरुंगात टाकताच गुजरातचीच नव्हे तर सर्व देशातील जनता क्रोधाने लालीलाल झाली . लोक स्वतःच कायदेभंगाच्या चळवळीत सामील होऊ लागले . स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार दुप्पट वेगाने सुरू झाला . स्वातंत्र्य चळवळीबद्दल , देशसेवेबद्दल सरकार सरदारांना तुरुंगात घालीत होते , तर भारतीय जनता त्यांच्या गळ्यात हार घालीत होती . ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले . 

🔹 स्वातंत्र्य संग्राम

 पोलादी पुरुष बनले पारतंत्र्याच्या वादळात सापडलेले देशाचे तारु कसेही करून स्वातंत्र्याच्या किनाऱ्याला लावायचे होते . संपूर्ण स्वातंत्र्य पदरात पडेपर्यंत गांधीजी जवाहरलालजी आणि वल्लभभाई यांचे प्राण पणास लागले होते . , अखेरचे शस्त्र उपसले गेले . १ ९ ४२ साली गांधीजींनी ' चले जाव आंदोलन पुकारले . इंग्रजांनो ' चालते व्हा'चा नारा देशभर घुमला . सारा देश पेटून उठला . त्याच रात्री गांधीजी , इतर अनेक नेते आणि वल्लभभाईंना पकडून सरकारने तुरुंगात डांबले . तरी स्वातंत्र्य चळवळ जोमाने सुरूच होती . शेवटी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले . तुरुंगातले खडतर जीवन भोगून , एक हजार दिवस तुरुंगात काढल्यानंतर वल्लभभाईंची सुटका झाली 

           १५ ऑगस्ट १ ९ ४७ रोजी भारत स्वतंत्र झाला . स्वातंत्र्याचे फळ पदरात पडले . पंडीत नेहरू पंतप्रधान व सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान बनले  भारताचा नवा संसार सुरू झाला . या नव्या संसाराची व्यवस्थित घडी बसविण्याची जबाबदारी वल्लभभाईंच्या शिरावर येऊन पडली . देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे अवघड कार्य वल्लभभाई करू लागले . पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झाल्यामुळे देशात दंगली पेटल्या होत्या . पंतप्रधान तर झाले . भारतातले काही संस्थानिक भारतापासून वेगळे राहण्याचा विचार करीत होते . वल्लभभाईंना असा तुकड्या तुकड्यांचा भारत नको होता . त्यांना एकसंघ भारत हवा होता . भारतात अनेक संस्थाने होती . आम्हाला स्वतंत्र राहायचे म्हणत होती . त्यांच्या अंगातले हे भूत उतरविण्यासाठी वल्लभभाई पुढे सरसावले . " बऱ्या बोलाने , मुकाट्याने भारतात सामील व्हा . नपेक्षा जनतेने बंड केले तर तुमच्या मदतीला कोणी येणार नाही , ' असे खडसावले . मग काय ? वल्लभभाईंनी सज्जड दम देताच , सरळ व्हावे तशी संस्थाने भारतात विलीन झाली . 

             ‌‌असे असले तरी जुनागड आणि हैदराबाद ही संस्थाने स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजत होती . वल्लभभाईंनी त्यांना निर्वाणीचा इशारा देताच जुनागड संस्थान विलीन झाले . मात्र , हैदराबाद संस्थान वठणीवर येत नव्हते ; परंतु वल्लभभाईंनी पोलिसी हिसका दाखवताच हैदराबादचा निजाम वल्लभभाईंना शरण आला . हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले . भारत एकसंघ बनला . वल्लभभाई आता सर्वांचे सरदार बनले . जगाच्या नकाशावर भारत हे एकसंघ राष्ट्र म्हणून उदयास आले . आता लोक त्यांना ' भारताचे पोलादी पुरुष ' असे संबोधू लागले . अशाप्रकारे वल्लभभाई देशाची घडी बसवीत असता महात्मा गांधींचा वध झाला . वल्लभभाईंना अतोनात दुःख झाले . आपले दुःख बाजूला ठेवून त्यांनी देशात पेटलेल्या दंगली शमवायला सुरुवात केली . ते रोज अठरा - अठरा तास काम करू लागले . हाडाची काडे करून ते आपल्या स्वातंत्र्यवृक्षाची जपणूक करू लागले . संवर्धन करू लागले ; परंतु आता ते खूप थकले होते . शारीरिक व्याधींनी उचल खाल्ली होती . तरी अहोरात्र ते राबतच होते 

🔹गौरव

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी , जनतेने त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होताच , त्यांचा भव्य सत्कार सोहळा घडवून आणला . त्यांचे धैर्य , चातुर्य , असीम त्याग , संघटन - कौशल्य , त्यांची दूरदृष्टी या गुणांचा गौरव केला . 

🔹 अखेरचा निरोप

           त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती ; पण शरीर साथ देत नव्हते . एक दिवस ते अंथरुणावर पडले . खूप उपचार झाले ; पण व्यर्थ . १५ डिसेंबर १ ९ ५० रोजी आपल्या मातृभूमीचा निरोप घेत ते निजधामाला गेले . त्यांच्या स्मृतीला आमचे अभिवादन . 

◾ अधिक माहिती पाहा ◾
🔹 भारताचे पहिले मंत्रीमंडळ
🔹 भारताचे उपपंतप्रधान यांची माहिती 

🙏 कृपया हि माहिती आवडल्यास शेअर, लाईक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले

Thanks for Watching 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या