Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील सर्वात प्रमुख नद्या/भारतातील प्रमुख नद्याची नावे/माहिती/लांबी



 नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                                नमस्कार मित्रहो शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत आहे या पेज मध्ये "भारतातील प्रमुख नद्याची नावे"
गंगा- गंगा नदीची लांबी तब्बल २५१० किलोमीटर असून ती हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
ब्रह्मपुत्रा- बह्मपुत्रा नदीची लांबी तब्बल २७०० किलोमीटर असून ती मानसरोवरात उगम पावते. भारतातील आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नंतर चीन आणि बांगलादेशात जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.
गोदावरी- गोदावरीची लांबी १४५० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते
यमुना- यमुना नदीची लांबी १३९६ किलोमीटर असून ती यमनोत्री येथे उगम पावते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, व हरयाणा या राज्यांतून वाहणारी यमुना गंगेची उपनदी असल्याने अलाहाबाद येथे गंगेला मिळते.
नर्मदा- नर्मदा नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहणारी नर्मदा नदी पश्चिमवाहिनी असून गुजरातमध्ये भडोचजवळ अरबी समुद्राला मिळते.
सिंधू- सिंधू नदीची लांबी २८८० किलोमीटर आहे. हिमालय पर्वतारांगात मानसरोवरात उगम पावते. काश्मीर- पंजाब- हिमाचल प्रदेशातून यांच्या काही भागातून वाहत ही नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. सिंधू नदी पाकिस्तानमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.
- गंडक नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती हिमालयात उगम पावते. उत्तर प्रदेश व बिहारमधून वाहणारी गंडक नदी गंगेची उपनदी असल्याने गंगेला मिळते.
कृष्णा नदीची लांबी १२९० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
चंबळ- चंबळ नदीची लांबी ९६६ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात इंदूरजवळ उगम पावते. मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहणारी चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते.
चिनाब (चंद्रभागा)- चिनाब नदीची लांबी ९६० किलोमीटर असून ती हिमाचल प्रदेशात उगम पावते. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून वाहणारी चिनाब नदी नंतर पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला मिळते.
तापी नदीची लांबी ७२४ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूलजवळ उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून वाहणारी तापी नदी पश्चिम वाहिनी असल्याने गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.
कावेरी नदीची लांबी ८०५ किलोमीटर असून ती कर्नाटकात उगम पावते. कर्नाटक व तामिळनाडूतून वाहणारी कावेरी बंगालच्या उपसागराच्या एका खाडीला मिळते.
कोशी नदीची लांबी ७२९ किलोमीटर असून ती नेपाळमध्ये हिमालय पर्वतात उगम पावते. नेपाळमधून बिहारमार्गे कोसी नदी भारतात गंगा नदीला जाऊन मिळते.
घाघरा नदीची लांबी ९७० किलोमीटर असून ती हिमालय पर्वतात उगम पावते. उत्तर प्रदेश- बिहारमधून वाहत जाऊन पुढे ती बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते.घाघरा नदी शरयू नदी म्हणूनही ओळखली जाते.
झेलम नदीची लांबी ८१३ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील बेरीनाग येथे उगम पावते. उत्तर प्रदेशमधून जम्मू काश्मीर- पंजाब मार्गे ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
- महानदी ८८५ किलोमीटर लांबीची आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात सिहावा पर्वतात उगम पावते. छत्तीसगड-मध्य प्रदेश-ओदिशा अशी वाहत ही नदी बंगालच्या खाडीत जाऊन मिळते.
रावी नदीची लांबी ७२० किलोमीटर आहे. ही नदी हिमाचलप्रदेशातील चंबा जिल्ह्यात उगम पावते. ही नदी हिमाचल प्रदेश- पंजाबमधून वाहत भारत पाकिस्तान सिमेवर चिनाब नदीला जाऊन मिळते.
- सतलज नदी विंध्य पर्वत रांगात उगम पावते. पंजाबमधून वाहणा-या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून या नदीची ओळख आहे.
नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या