Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

सावित्रीबाई फुले.savitribai fule

नमस्कार मित्रहो शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या पेज मध्ये सावित्रीबाई फुले यांची माहिती,देण्यात आली आहे. .

💠 सावित्रीबाई फुले 💠


        
            महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते . कारण स्त्री - शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या . 🔹जन्म:सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला . त्या नायगाव ( ता . डाळा , जि . सातारा ) येथील खंडोजी नेवसे - पाटील यांच्या कन्या होत .
 🔹विवाह :इ . स . १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले . त्यावेळी ज्योतिबांचे वय तेरा वर्षांचे तर सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षांचे होते . लग्न झाले तेव्हा त्या निरक्षर होत्या .
🔹 मृत्यू : १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

 🔶 कार्य :

             १८४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री - शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली . ज्योतिबांनी आपल् अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप , असे त्या काळी सर्वच समाज समजत होता पुण्यातील उच्चवर्णीयांना व सनातनी लोकांना याचा अतिशय संताप आला त्यांनी सावित्रीबाईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली . सावित्रीबाई शाळेत जात - येत असताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदानालस्ती करीत . काही कर्मठ लोक त्यांच्या अंगावर चिखल - शेण फेकीत , त्यांना दगड मारीत पण सावित्रीबाईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले . सनातनी लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरले . त्यामुळे आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे त्यांना मानवले नाही .
🔹 त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे . कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे , अशी रूढी होती . तिला अपशकुनी समजले जाई . तिला पांढरे वस्त्र परिधान करून घरातच कोंडून ठेवले जाई . सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले . केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे , असे त्यांनी ठरविले . परंतु लोक ऐकेनात . तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो , हे केवढे पाप आहे , याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनास जाऊ नका असे सांगितले . न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला . तो खूप गाजला . 🔹सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरू केले . बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले . भ्रूणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे , असे त्यांनी पाहिले . विधवांसाठी सुरक्षितपणे बाळंतपण व्हावे , म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले . सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या . अस्पृश्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे हौद खुले केले . त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता .
🔹 इ.स. १८ ९ ३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते . त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या . तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले .
🔹 सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८ ९ ० साली प्रसिद्ध झाला .  . 
🔹इ . स . १८४ ९ २ गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले .
🔹इ . स . १८६३ मध्ये महात्मा फुल्यांनी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलांसाठी • बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले . या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्या काम सावित्रीबाई करीत . या अनाथ मुलांवर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करो व त्यांची सर्व प्रकारची सेवा करीत . त्यांना स्वतःला अपत्य नव्हते . पुढे अश एका अनाथ मुलाला ' यशवंता ' ला त्यांनी दत्तक घेतले .
🔹इ . स . १८ ९ ० मध्ये महात्मा फुले यांचे निधन झाले . पुढे सत्यशोधक समाजाच्य आंदोलनाची धुरा सावित्रीबाईंनी वाहिली .
🔹इ . स . १८ ९ ३ मध्ये सासवड ये सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले . ●

🔶 त्यांची ग्रंथसंपदा :

          काव्यफुले , बावनकशी , सुबोध रत्नाकर , मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व इत्यादी . 

🔶 गौरव :

             इंग्रज सरकारने विश्रामबागवाडयात त्यांचा सत्कार केला स्त्री-शिक्षकेचा हा पहिला गौरव होता.

🔶  विशेषता:

🔹महाराष्ट्रातील स्त्री - मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी . 
🔹 पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका . 
🔹 त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्तिदिन म्हणून पाळण्यात येतो . 
१० मार्च १८ ९ ७ साली पुण्याला प्लेगची साथ आली . सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले . आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला . स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते , हे त्यांनी स्वत : च्या कृतीने सिद्ध करून दाखविले
💠 महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्याची माहिती पहा
💠 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती पहा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या