Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

राजश्री शाहू महाराज यांची माहिती/कार्य

                 कोल्हापूर संस्थांचे अधिपती व थोर समाजसुधारक   यशवंत ऊर्फ "राजश्री शाहू महाराजाचा" जन्म २६जुलै १८७४ रोजी झाला . महाराजांच्या वडीलाचे नाव श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे व त्यांच्या जनक मातुश्रीचे नाव राधाबाई साहेब असे आहेत.चवथे शिवाजी महाराज हे


अहमदनगर येथे मुत्यु पावल्या नंतर त्याच्या धर्मपत्नी आनंदीबाई साहेब यांनी आपल्या सासुबाई सकवारबाई महाराज यांच्या संमतीने यशवंतराव यांना दत्तक घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे मुंबई सरकारने २२फेबुरवारी १८८४ रोजी दत्तकास मंजुरी दिली.१७ मार्च १८८४ ह्या दिवशी राज्यारोहण सभारभाकरीता कायम करून त्या दिवशी दत्तक झाले.अवघ्या दहा वर्ष वयात यशवंतरावांना कोल्हापूरच्या राज्यावर बसण्याची वाट मीळाली त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली.त्यांना पाच्श्रात्य देशात जाने शक्य नव्हते पण १८८५ सारी राजकोट येथील राजकुमारासाठी असलेल्या काॅलेजात महाराजाचे शिक्षण सुरू झाले.इंग्रजी भाषा,राज्य कारभार,जगाचा इतिहास विषयाचा महाराजांनी अभ्यास केला 

शिक्षण घेते असताना महाराजांना शिकार व कुस्ती हे मुख्यत आवडत असे कुस्ती व घोड्यावर बसण्यात इतर राजपुत्र तयार नसत मित्रासी महाराज साधेपणाने वागत ते मनमिळाऊ होते .कोणालाही त्याच्या विषयी परकेपणा जाणवत नसे .महाराज जनावरांवर अतिशय प्रेम करीत दाणापाणी देण्याच्या कामात स्वत:हा मदत करीत असे .महाराजाचे नेक नामदार गव्हर्नर साहेब यांनी ४ मार्च १८८९ दिवसी लिहलेल्या पत्रातील मजकूर -"आपल्या वडिलाप्रमाणे आपल्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य्क्रमात दर्यादिल अंत:कर्णाचे ,न्यायी व प्रतिष्ठीत असे निप्जून प्रजाप्रीय व्हाल असा मला भरवसा वाटतो "यावरून महाराजाच्या वडिलाचे संस्कार महाराजावर किती खोलवर झाले असेल व महाराजांनी ते आत्मसात केले .

 महाराज शाळेत असतानाचा १८८९ सालचा आहवाल -"महाराजांना व्यवहार ज्ञान फार चागले आहे त्याची स्मरणशक्ती फार चागली आहे .स्वभावाच्या बाबतीत पहिले तर -ते निरोगी मनाचे ,उघड्या दिलाचे ,उदार व सच्छील असे असून अहमपनाच त्यांना वाराही नाही त्याच्या विचारपण नाची व नि:स्वार्थपणाची मी पुष्यकळ उदह्र्ण पाहली ते दिसतात तसे सुस्वाभी आहेत असे नमूद केले आहे."

राजश्री शाहू महाराजाचे धारवाड येथे शिक्षण चालू असताना त्यावेळच्या प्रथेनुसार विवाह करण्यात आला १ एप्रिल १८९१ रोजी महाराजाचा विवाह उच्च व नामांकित घराणे  गुनाजीराव खानविलकर यांच्या कन्या श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या सोबत झाला.महाराजाचे शिक्षण चालू असतानाचं महाराणी लक्ष्मीबाई यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली.मिसेस फॉक्स याच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली .विवाहसमयी लक्ष्मीबाई चे वय अवघे ११  वर्षाचे होते.

छत्रपती शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी अधिकार ग्रहण केले त्याच्या जाहीरनाम्यात आमचे प्रजाजन सदा सुखी व संतुष्ट असावेत त्याच्या हिताची एकसारखी अभिवृद्दी होत जावी व आमच्या संस्थानाचा सर्व बाजूनी अभयुद्य व्हावा अशी आमची उत्कृष्ट इच्छ्या आहे यासाठी सर्वच्या राजनिष्ठेची व सहकार्याची आवश्यकता आहे. या त्यांच्या जाहीर नाम्यावरून त्याच्या विचाराची प्रभग्लता लक्षात येते.

शाहू महाराजांनी अधिकारावर आल्यावर  नोकराची पाहणी केली असता त्याच्या लक्षात आले कि बहुजन समाजातील माणसाना डावलण्यात आले आहे .मग इंग्रजाचा रोष पत्करून त्यांनी बहुजन समाजावर लक्ष केंद्रित केले महाराजांना लोकशाही कारभाराची आवड होती .स्वराज्याचे सुराज्य व्हावे हि मनोमन त्याची इच्छ्या होती त्या दृष्टीने ध्येय धोरणे  आखण्यास  सुरवात केली .

महाराजांनी देशातील राजकीय ,सामाजिक ,व धार्मिक इतिहास अभ्यासला होता त्याकाळच्या मोठ्या नेत्यामध्ये राजकीय सुधारणा कि सामाजिक सुधारणा एक मत नव्हते मात्र त्या वादात न पडता महाराजांनी बहुजन समाजाची दु:खे  आणि आणि सर्वसामान्य मासाची कोंडी जाणून घेतली सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करता त्या काळात उच्च वर्गीयांचे वर्चस्व असल्याचे आढळले .महाराजांनी अधिकार हातात येताच बरेच युरोपियन अधिकारी निवृत्त होवून गेले उधळ पट्टीमुळे संस्थानाच्या तिजोरीत तुट पडली होती .सर्व जनता कर्जबाजारीपणामुळे जर्जर झालेली होती .त्याच्या सर्व जमिनी जमीनदाराच्या ताब्यात गेल्या होत्या शाहू महाराजांनी जनतेची काळजी घेण्याचा निश्चय केला आणि तो त्यांनी अमलात आणला .म्हणून त्यांना "रयतेचा राजा "म्हणतात 

शिक्षणाच्या दृष्टीने समाज मागासलेला होता शैक्षणिक क्रांती हा महाराजाचा कार्याचा एक महत्याच पैलू आहे.अज्ञान व दरिद्री यामध्ये अडकून पडलेल्याना शिक्षण देण्याचे ठरविले १८९४ साली शिक्षिताची पाहणी केली गावो गावी प्राथमिक शाळा नव्हत्या गरीबाची मुले फी भरण्यास सक्षम नव्हती जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्ष्णाशियाय पर्याय नाही त्यासाठी महाराजांनी १९२० साली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले .आणि जनतेला साक्षर करायचे निर्णय घेतला .आजही सुध्धा प्राथमिक शिक्षण शिक्षणाच्या सार्वत्रीकिकरणाचेशैक्षणिक धोरण आखले जात 

१५ एप्रिल १९२० च्या नाशिक परिषदेत राजश्री शाहू महाराज म्हणतात "मी माझ्या संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले असून त्या योगाने पुढची पिढी शिक्षित होईल यात शका नाही :

शाहू महराजांनी शिक्षणावर जादा खर्च करण्याचे धोरण आवलबिले कोल्हापूर संस्थानात १९२१ साली नवीन शाळा प्रत्येक खेड्यात काढून त्यावर वतनदार शिक्षक नेमण्याची योजना काढली पण वतनदार शिक्षक नेमण्यासाठी जमिनी मिळण्याची अडचण जाणवली मग त्यांनी १९१४ साली पगारी शिक्षक नेमले वतनदार शिक्षक योजना रद्द केली .देवस्थानचा आवश्यक खर्च करून उरलेल्या रक्कम शिक्षणावर खर्च करावी असे त्यांनी आज्ञापत्रात काढले खेड्यापाड्यात सक्तीचे शिक्षण सुरु केले .

१९९४ साली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय कोल्हापुरात राजाराम हायस्कूल व राजाराम कालेजच्या सर्व गरीब विध्यार्थ्यांना फी माफ केली त्यांनी १८९६-९७ च्या अहवालात जाती-जमाती साठी वस्तीगृह काढण्याची योजना जाहीर केली १९०० सालापासून त्या योजनेची कार्यवाही करण्यास सुरवात केली "का ँलेज विध्यार्थी वसतिगृह ,व्हीकोटोरीया मराठा बोर्दिन ,जैन वस्तीगृह,टेक्निकल स्कूल .मराठा स्टुडटस इन्स्टिट्यूट वसतिगृह ,लिंगायत वसतिगृह ,मुस्लीम वसतिगृह,मिस क्लार्क होस्टेल ,शिंपी वसतिगृह ,पृभू वसतिगृह ,सरस्वत वसतिगृह,खिश्र्चन मिशन ,व विद्यार्थ्याच्या जागा व इमारतीची सुविधा ,शाहू मराठा बोर्डिंग इंदुमती वसतिगृह इत्यादी वसतिगृहाची उभारणी केली 

शेती विकासाबद्दल महाराज जागरूक राहिले संस्थानातील शेतकरी अज्ञानी आहे सावकाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे हे त्यांनी ओळखले संस्थानाला १८२७ साली दुष्काळाची झळ पोहचली दुष्काळ निवारण्यासाठी महाराजांनी अन्नछत्र सुरु केले कर्जपिडीत शेतक-यांना कर्ज दिले सावकाराच्या तावडीतून त्यांना सोडविले सावकाराकडून त्याच्या जमीने परत मिळवून दिल्या स-याची सूट दिली १९०४ साली महाराजांनी चहाची लागवड केली रेशीम तयार करण्यासाठी तुतीची लागवड केली पन्हाळाला काँफीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला डुकरे ,हरीण,ससे इत्यादी साठी पार्क तयार केले शेतक-यावर जमीनदाराचा छळ होत असे त्यासाठी महाराजांनी १९१८ साली कुलकर्णी वतने नाहीशी करण्याचा कायदा केला .महाराजवर त्यावेळी वृत्तपत्रातून जातीनिष्ट म्हणून टीका झाली परंतु महाराज डगमगले नाहीत मुंबई सरकारने १९५० साली वतने नष्ट करण्याचा कायदा केला तलाठी पध्दत सुरु केली खेड्यापाड्यात महार वतने होती वतनासाठी जनावराप्रमाणे राबवल्या जाई महाराजांनी 25 जून १९१८ साली कायदा करून त्याच्याकडून सक्तीने कामे करून घेण्यास बंदी केली १९१९ साली हुकुम काढून बलुतेदार पद्धत बंद केली .

कोल्हापूरच्या भोगावती नदीला बंधारा बाधण्याची योजना आखली त्या दृष्टीने राधानगरी हे गाव वसविले धरण बांधले शेतीला पाणी पुरविले ,वीज प्रकल्प सुरु केला शाहू महाराजांनी ओधोगिक विकासाचाही विचार केला सन १९५४ साली कोल्हापूरची महानगरपालिका स्थापन झाली .गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना केली .शाहू स्पिंनिग अँड विव्हिंग मँन्युफ्क्च्रिंग कंपनी सुरु करण्याची घोषणा १९०५ साली केली १९०६ साली महाराजांनी शाहू मिलचा पाया घातला  या गिरणीसाठी महाराजांनी जागा फुकट दिली महाराज पुण्याच्या स्वदेशी कागद गिरणीचे आश्रयदाते होते .महाराजांनी गुजरात,राजस्थानमधील व्यापा-यांना कोल्हापुरात आणले निपाणी ,बेळगाव  भागातील व्यापारांना शहापुरी पेढेत आश्रय दिला उधोग व्यापाराला महाराजांनी उत्तेजना दिली.

महाराजांनी १९१२ साली सहकार चळवळीला चालना दिली को-आँपरेटीव्ह सोसायटी हे त्यापैकी एक नंतर कोल्हापुरात अर्बन को-आँपरेटीव्ह सोसायट्या सारख्या संस्था निघाल्या .महारजांनी लक्ष्मी तलाव बांधून हरित क्रांतीचा पाया घातला सहकारी तत्वावर कारखाने  निर्माण करण्याची त्यांची योजना होती राजश्री शाहू महाराज शेती ,उधोग.व्यापार, व सहकार या मानवी जीवनाच्या राहणीच्या दर्जा वाढविण्याच्या मूल्याचे प्रवर्तक ठरले .

शाहू महाराजनी ज्ञानाची ज्योत सर्व महाराष्ट्रात पेटती ठेवली अस्पृश्तेचा काळिमा दूर करणारा हा छत्रपती होते .शाहू महाराजाचे कर्तुत्व मैलिक व महान आहे.गरीबाचा कैवारी "विद्देचा पुजारी ""गुणवंताचा आश्रयदाता ""महान क्रांतीकारक ""थोर विचारवंत"होते.

१९१७ साली खामगाव येथे भरलेल्या शिक्षणपरिषदेचे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले शिपाई शेतकरी व मजूर म्हणवून घेण्याचा मला अभिमान वाटतो माझे वाडवडील शेतकरीच होते माझ्या आईचे मुधोळच्या घोरपडे घराणे.माझ्या दत्तक आईचे शिर्के व दत्तक वडिलाचे भोसले घराणे मी शेतकरी वर्गापैकी एक आहे .

शाहू महाराजांचे त्यांच्याविषयीचे प्रेम माझ्या मुळेच असून शिपाई आणि शेतकरी यांचे रक्त माझ्या  धमन्यातून खेळत आहे

 जाती भेद असेपर्यंत स्वराज्याचा उपयोग नाही असे उद्गार महाराजांनी काढले अस्पृश्य होत असलेल्या त्रासाचा उल्लेख आपल्या बोलण्यात ते अत्यंत पोटतिडकीने करीत .त्यासाठी अस्पृष्या लोकांना वरिष्ठ वर्गाच्या जागा त्यांनी दिल्या अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून सार्वजनिक शाळातच त्यांना शिकवले पाहिजे अशी व्यवस्था महाराजांनी केली

याशिवाय सार्वजनिक तलाव, विहिरी, पानवते, घाट, धर्मशाळा वगैरे ठिकाणी इतर  मनुष्याप्रमाणे वागण्यास सर्रास परवानगी दिली. याचवेळी कित्येक अस्पृश्य वर्गीय तरुणांना संस्थानात वकिली करण्यात सनदी दिल्या .महाराज नागपूर येथील अस्पुशय परिषदेत गेले परिषदेला खूप हरिजन मंडळी आली होती

राजश्री शाहू महाराजांना होयबा प्रवृत्तीचा तिटकारा होता .हाजी -हाजी करणा-या माणसाची महाराजांना चीड होती .महाराजाचे स्वत:हाच्या धर्मावर जसे प्रेम होते तसे इतर धर्मावर अलोट प्रेम होते.महाराजाचे मुख्य ध्येय "सत्य"आचरणात आणण्याचे होते.


 जन्म : राजश्री शाहू महाराजाचा जन्म कोल्हापूर येथील कागल गावामध्ये झाला २६ जुलै १८७४ रोजी झाला महाराजाचे कारे नाव यशवंतराव घाटगे असे होते . 

मूत्यू :6 मे १९२२ 

 वडिलांचे नाव : श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे 

आईचे नाव : राधाबाई साहेब

पत्नी :महाराणी लक्ष्मीबाई 

 शिक्षण :राजकोट येथील राजकुमारासाठी असलेल्या काॅलेजात महाराजाचे शिक्षण सुरू झाले.इंग्रजी भाषा,राज्य कारभार,जगाचा इतिहास विषयाचा महाराजांनी अभ्यास केला 

 कार्य  .सार्वजनिक तलाव, विहिरी, पानवते, घाट, धर्मशाळा वगैरे ठिकाणी इतर  पुष्य मानसाप्रमाने वागण्यास सर्रास परवानगी दिली ,अस्पृश्य वर्गीय तरुणांना संस्थानात वकिली करण्यात सनदी दिल्या,अस्पृष्या लोकांना वरिष्ठ वर्गाच्या जागा त्यांनी दिल्या अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून सार्वजनिक शाळातच त्यांना शिकवले पाहिजे अशी व्यवस्था महाराजांनी केली,महाराजांनी १९१२ साली सहकार चळवळीला चालना दिली को-आँपरेटीव्ह सोसायटी हे त्यापैकी एक नंतर कोल्हापुरात अर्बन को-आँपरेटीव्ह सोसायट्या सारख्या संस्था निघाल्या .महारजांनी लक्ष्मी तलाव बांधून हरित क्रांतीचा पाया घातला सहकारी तत्वावर कारखाने  निर्माण करण्याची त्यांची योजना होती राजश्री शाहू महाराज शेती ,उधोग.व्यापार, व सहकार या मानवी जीवनाच्या राहणीच्या दर्जा वाढविण्याच्या मूल्याचे प्रवर्तक ठरले .,कोल्हापूरच्या भोगावती नदीला बंधारा बाधण्याची योजना आखली त्या दृष्टीने राधानगरी हे गाव वसविले धरण बांधले शेतीला पाणी पुरविले ,वीज प्रकल्प सुरु केला शाहू महाराजांनी ओधोगिक विकासाचाही विचार केला सन १९५४ साली कोल्हापूरची महानगरपालिका स्थापन झाली .गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना केली .शाहू स्पिंनिग अँड विव्हिंग मँन्युफ्क्च्रिंग कंपनी सुरु करण्याची घोषणा १९०५ साली केली १९०६ साली महाराजांनी शाहू मिलचा पाया घातला  या गिरणीसाठी महाराजांनी जागा फुकट दिली महाराज पुण्याच्या स्वदेशी कागद गिरणीचे आश्रयदाते होते .महाराजांनी गुजरात,राजस्थानमधील व्यापा-यांना कोल्हापुरात आणले निपाणी ,बेळगाव  भागातील व्यापारांना शहापुरी पेढेत आश्रय दिला उधोग व्यापाराला महाराजांनी उत्तेजना दिली.,१८२७ साली दुष्काळाची झळ पोहचली दुष्काळ निवारण्यासाठी महाराजांनी अन्नछत्र सुरु केले कर्जपिडीत शेतक-यांना कर्ज दिले सावकाराच्या तावडीतून त्यांना सोडविले सावकाराकडून त्याच्या जमीने परत मिळवून दिल्या स-याची सूट दिली १९०४ साली महाराजांनी चहाची लागवड केली रेशीम तयार करण्यासाठी तुतीची लागवड केली पन्हाळाला काँफीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला डुकरे ,हरीण,ससे इत्यादी साठी पार्क तयार केले शेतक-यावर जमीनदाराचा छळ होत असे त्यासाठी महाराजांनी १९१८ साली कुलकर्णी वतने नाहीशी करण्याचा कायदा केला,१५ एप्रिल १९२० च्या नाशिक परिषदेत राजश्री शाहू महाराज म्हणतात "मी माझ्या संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले,महाराजांनी १९२० साली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले .

महाराज निरोगी मनाचे ,उघड्या दिलाचे होते .महाराजाची विचार शक्ती स्मरण शक्ती तीव्र होती.ज्या छत्रपती ताराबाई महाराणी कोल्हापूरचे राज्य स्थापन केले त्यांना त्याचा वंश चालविणार्या छत्र्प्तीना व ज्यांनी शाहू युग निर्माण करून आपली कारकीर्द अजरामर केली त्या शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या